Illegal Pregnancy Test Kolhapur Police esakal
कोल्हापूर

गर्भलिंग निदान छाप्यात आणखी तीन एजंटांना अटक; मुख्य सूत्रधार बनावट डॉक्टर पाटील पोलिसांच्या रेकॉर्डवरील!

नवीन वाशीनाका येथील बेकायदा गर्भलिंग निदान (Pregnancy Test) छाप्यात आणखी तीन एजंटांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

मुलगा होण्याचे औषध देण्याचा दावा सोशल मीडियावर करून बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला.

कोल्हापूर : नवीन वाशीनाका येथील बेकायदा गर्भलिंग निदान (Pregnancy Test) छाप्यात आणखी तीन एजंटांना पोलिसांनी अटक केली. प्रदीप बाजीराव कोळी (वय ४२, रा. वळिवडे, ता. करवीर), पंकज नारायण बारटक्के (वय ३३, रा. सुलोचना पार्क, नवीन वाशीनाका, कोल्हापूर) आणि निखिल रघुनाथ पाटील (वय ३०, रा. धामणवाडी, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.

या तिघांनीही गर्भलिंग निदानासाठी प्रत्येक दोन-तीन ग्राहक शोधून बनावट डॉक्टर स्वप्नील पाटील (Swapnil Patil) याच्यापर्यंत पोहोचविल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी करे यांनी दिली.

दरम्यान, नवीन वाशीनाका येथील सुलोचना पार्क येथील अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर टाकलेल्या छाप्यातील मुख्य सूत्रधार बनावट डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याचा यापूर्वीही राधानगरी आणि मुरगूड येथील छाप्यातील सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी १६ जानेवारीला सायंकाळी नवीन वाशीनाका येथील सुलोचना पार्क येथील म्हाडा कॉलनीत छापा टाकून सोनोग्राफी मशीनसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

मुलगा होण्याचे औषध देण्याचा दावा सोशल मीडियावर करून बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. तेंव्हा तेथे घरमालक अमित केरबा डोंगरे (वय ३३, रा. सुलोचना पार्क) आणि एजंट कृष्णात आनंदा जासूद (वय ३३, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) या दोघांना तर दुसऱ्या दिवशी बनावट डॉक्टर स्वप्नील पाटीलला अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल हॅण्डसेटवरून माहिती घेऊन आणखी तीन एजंटना अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिक तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यत तपास अधिकारी खरे यांनी व्यक्त केली.

गर्भपाताच्या गोळ्या स्‍वनील पाटीलकडूनच..

यापूर्वी बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या कागल तालुक्यातील एका मृत व्यक्तीकडून संबंधित सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. गर्भपाताच्या गोळ्या संबंधित बनावट डॉक्टर स्‍वनील पाटील याच्याकडूनच आणल्या जात होत्या, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तसेच आजपर्यंत केवळ गर्भलिंग निदान तपासले आहे. केवळ एकच गर्भपात झाल्याची माहिती पुढे आली असून, त्याचा तपास सुरू असल्याचेही अधिकारी खरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT