कोल्हापूर

मद्यपि आणि हुल्लडबाजांवर पोलीस कारवाईची गरज

CD

हुल्लडबाजी पर्यटकांवर
कारवाईची मागणी
आंबा : धबधब्याच्या ठिकाणी काही मद्यधुंद अवस्थेतील पर्यटक हुल्लडबाजी करतात. अशा टोळक्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. मद्यपि आणि अतिउत्साही हुल्लडबाजांनी रविवारी मलकापुरात धिंगाणा घालत एका ट्रकचालकास मारहाण केली होती. त्यामुळे स्थानिकांसह कुटुंबवत्सल महिलांना याचा त्रास होत आहे. पर्यटनस्थळांकडे जाताना भरधाव मोटारसायकल चालवणे, टोमणे मारणे, मद्यधुंद अवस्थेत बीभत्सपणे नाचणे, ट्रिपल सीट बसून किळसवाणे हातवारे करणे, असे अनेक प्रकार घडत असल्यामुळे या हुल्लडबाज पर्यटकांमुळे पर्यटनस्थळेच बदनाम होऊ लागली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बर्की, केर्ले, मानोली व उखळू येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. या धबधब्यांवर पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे येत आहेत. आंबा घाटाबरोबर मानोली जंगलाचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच साद घालत असतो. त्यामुळे वीकेंडला या भागात पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे; परंतु अतिउत्साही आणि हुल्लडबाजांमुळे कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. अशा हुल्लडबाजांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास महिलावर्गाला पावसाळी पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT