कोल्हापूर

धामणी प्रकल्पाची घळभरणी पावसाळ्यानंतर

CD

1635
राई ः लाभक्षेत्रातील शेतकरी आणि कृती समितीचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करताना कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर व इतर.
......
धामणी प्रकल्पाची
घळभरणी पावसाळ्यानंतर

आढावा बैठकीत रोहित बांदिवडेकर यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. १९ : राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्पाची पावसाळ्यात होणारी घळभरणीची कामे तांत्रिक कारणाने प्रलंबित ठेवली आहेत. मात्र, येत्या ऑक्टोबरपूर्वी इतर सर्व कामे करण्याचे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रकल्पात एक टीएमसी पाणी साठ्याचे नियोजन असल्याने लाभ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले. प्रकल्पस्थळावर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
गेल्या २० वर्षांपासून धामणी प्रकल्पाचे काम विविध कारणांनी रखडले असून, धामणी खोऱ्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने यावर्षीच्या पावसाळ्यात घळभरणी करून पाणी साठवण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे यावर्षी घळभरणी कामात अडथळा येणार असल्याचे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत संबंधितांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे धामणी खोरा विकास कृती समितीने तांत्रिक अडचण मान्य करून १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सर्व अनुषंगिक आणि पुनर्वसनाची कामे पूर्ण करून घळभरणीच्या कामास सुरुवात न झाल्यास प्रकल्पस्थळावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
जूनमध्ये आढावा बैठक घेण्याचे तेव्हा निश्चित केले होते त्यानुसार आज बैठक झाली. यावेळी कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी येत्या ऑक्टोबरमध्ये घरभरणीच्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी केली असून काही किरकोळ परवानग्या मिळणे बाकी आहे. त्या पावसाळ्यात घेऊन घळभरणीचे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी कृती समितीच्या वतीने संबंधितांना निवेदन दिले. यावेळी कृती समितीच्या वतीने राजाराम पात्रे, मनोज देसाई, उदय देसाई, रामदास चौगुले महेश आठल्ये, संभाजी पाटील, पांडुरंग पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

KL Rahul ची कसोटीमधून निवृत्ती? 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, खराब फॉर्ममुळे निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT