कोल्हापूर

रेल्वेची धडक बसून गडमुडशिंगीत मेहुणे-पाहुणे ठार

CD

फोटो
....

रेल्वेची धडक बसून मेहुणे- पाहुणे ठार

गडमुडशिंगी हद्दीतील रेल्वे पटरीवरील दुर्घटना

गांधीनगर, ता. ८ : रेल्वेची धडक बसल्याने खंडू नागनाथ भिवरकर (वय ३५, रा. शाहूनगर, गडमुडशिंगी) आणि हणमंत जालिंदर शिंदे (वय ३३, रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) हे मेहुणे- पाहुणे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वळिवडे रेल्वे स्टेशन- कोल्हापूर मार्गावर गडमुडशिंगी हद्दीत रेल्वे पटरीवर घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गडमुडशिंगीची यात्रा असल्याने यात्रेसाठी खंडू भिवरकर यांच्या घरी मेहुणे हनुमंत शिंदे आले होते. ते दोघे घरी जेवण करून गांधीनगर येथे कामानिमित्त गेले होते. रात्री काम आटोपून रेल्वेच्या रुळावरून घरी परतत असताना कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या रेल्वेची त्या दोघांना धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. ही घटना रेल्वे कर्मचारी संदीप मोतीलाल कंजारभाट (रा. रेल्वे कॉलनी, शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्या सकाळी साडेआठच्या सुमारात निदर्शनास आली. त्यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून याबाबतचा तपास सहायक फौजदार सुभाष सुदर्शनी करत आहेत. ऐन यात्रेत मेहुणे -पाहुण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शाहूनगरात हळहळ व्यक्त होत आहे.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT