कोल्हापूर

फुटबॉल प्रशिक्षकांसाठी अर्जांचा पाऊस

CD

फुटबॉल संबंधित किक मारतानाचा संग्रहित फोटो वापरावा...
......
फुटबॉल प्रशिक्षकांसाठी अर्जांचा पाऊस

भारतीय राष्ट्रीय संघ : २९१ इच्छुक; एआयएफएफ घेणार महिनाअखेरीस निर्णय

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : भारतीय वरिष्ठ राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. तब्बल २९१ अव्वल प्रशिक्षक यासाठी इच्छुक आहेत. यातील १०० जण युएफा प्रो लायसन्स, तर २० प्रशिक्षक एफसी प्रो लायन्ससधारक आहेत. प्रशिक्षक पदासाठी मोठ्या संख्येने अर्ज आल्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात हा चर्चेचा विषय आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) या महिना अखेरीस (जुलै) याचा निर्णय घेणार आहे.
आशिया खंडातून सन १९८६ पासून भारत विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीत सहभागी होतो आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ संघ पात्र ठरतात. गतविजेत्यासह एकूण १२५ हून अधिक संघ या जगातील सर्वांत मोठ्या क्रीडा सोहळ्याला पात्र होण्यासाठी झुंजतात. दुर्दैवाने आजअखेर भारताला दुसऱ्या फेरीपर्यंतही मजल मारता आलेली नाही. गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाचे प्रशिक्षक असणारे क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पात्रता फेरीत निराशाजनक कामगिरीमुळेच एआयएफएफने त्यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागेवर नवा प्रशिक्षक निवडला जाणार आहे.
गलेलठ्ठ मानधन आणि उच्च दर्जाच्या सुविधा आणि सहायक प्रशिक्षक देऊनही या परदेशी प्रशिक्षकांना कामगिरी उंचावता आलेली नाही. तुलनेत भारतीय सईद अब्दुल रहिम, जर्नेलसिंग, सईद नईमुद्दीन यांनी नजरेत भरणारे यश मिळविले. अलीकडे अरमांडो कुलासो, सुखविंदर सिंग, डेरेक डिसोझा अशांना पुरेसा वेळ दिला नाही. तुलनेत परदेशी प्रशिक्षकांना अधिक वेळ दिल्याचे तक्रार भारतीय प्रशिक्षकांची आहे. या निवडीकडे भारतीय फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून आहे.
...
चौकट...
महत्त्वपूर्ण निवड
कोणत्याही खेळाची लोकप्रियता ही त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उठावदार कामगिरीवरून वाढते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगिरी उत्कृष्ट होण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षकाची आवश्यकता असते. त्यामुळे जगात सर्वाधिक लोकसंख्या असूनही आजअखेर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पात्रतेसाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय संघाला चांगल्या प्रशिक्षकाची गरज आहे. कारण, क्रिकेटपाठोपाठ लोकप्रिय असूनही केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमार कामगिरीमुळे भारतीय फुटबॉल पिछाडीवर राहिल्याचे जाणकारांचे मत आहे.
...
देशी की परदेशी?
भारतीय फुटबॉलच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर परदेशीपेक्षा देशी प्रशिक्षक अधिक यशस्वी ठरलेत. सन १९५० ते १९८० च्या दशकात मुख्यतः आशियाई स्तरावर दिग्गज संघांना घाम फोडण्याची क्षमता भारतीय संघात होती, पण गेल्या तीन दशकांत एआयएफएफने परदेशी प्रशिक्षकावर विश्वास दाखविला. परंतु, सॅफव्यतिरिक्त या प्रशिक्षकांना छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे भारतीय प्रशिक्षकालाच संधी द्यावी, असा एक मतप्रवाह आहे. परदेशी हवाच असेल तर नवखा घेण्यापेक्षा इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) यशस्वी ठरलेल्या स्पेनच्या सर्जिओ लोबेरो (ओडिशा एफसी), अँथोनी अब्बास (मोहन बागान), मानोलो मार्केझ (एफसी गोवा), कार्लेस कुदारत (ईस्ट बंगाल) यांनाच संधी द्यावी, असा दुसरा मतप्रवाह आहे.
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT