कोल्हापूर

तळसंदे नजीक अज्ञातांनी ऊसाचा ट्रॅक्टर पेटविला चालकाने योग्य आग बुजविल्याने मोठे नुकसान टळले.

CD

09272

तळसंदे: येथे अज्ञातांनी रविवारी मध्यरात्री ट्रॅक्टरचे टायर पेटविले.
...

तळसंदेनजीक उसाचा ट्रॅक्टर पेटविला

घुणकी, ता.१३: वाठार - वारणानगर रस्त्यावरील तळसंदे हद्दीत वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर चालकाला अज्ञातांनी मारहाण करीत, ट्रॅक्टरची चावी व मोबाईल जबरदस्तीने काढून घेवून ट्रॅक्टरच्या टायर पेटविल्या. या घटनेमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. ही घटना रविवारी (ता. १२) मध्यरात्री ११.३० च्या सुमारास घडली. चालक अतुल शिवराज आंबटवाड (वय १९, रा. आलेगांव (ता. कंधार जि. नांदेड, सध्या रा. सावर्डे) याने वेळीच आग विझविल्याने मोठे नुकसान टळले. याबाबत पेठवडगाव पोलिसांत अज्ञाताविरुध्द चालकाने फिर्याद दिली आहे.
याबाबत पेठवडगाव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सावर्डे (ता. हातकणंगले) येथील धनाजी शिंदे यांच्या मळ्यातून ऊस तोडणी केलेला ऊस चालक अतुल आंबटवाड ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान, तळसंदे गावाजवळ आला असता जिल्हा जमावबंदी आदेशाचा भंग करत अज्ञात १० ते १२ जणांनी ऊस आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत उसाची वाहतूक करायची नाही, असे म्हणत चालकला टॅक्टरमधून खाली उतरवून चावी व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर ट्रॅक्टरवर दगडफेक करीत ट्रॅक्टरचे समोरील हेडलाईट, बॉनेट, जाळीचे पाच हजारांचे नुकसान केले. अज्ञातांनी दगड, लाथाबुक्क्यांनी ट्रॅक्टरच्या चारही टायरवर पंक्चर काढण्याचे सोल्यूशन टाकले. त्यानंतर पुढील टायर पेटवून ट्रॅक्टरचे नुकसान केले. दरम्यान, चालकाने धाडसाने टायरी विझवून ऊस भरलेला ट्रॅक्टर कारखान्याकडे नेला.
दरम्यान, आज दुपारी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी वारणानगर येथील वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वाहनतळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भैरव तळेकर, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड उपस्थित होते. पोलिसांनी विविध कलमांनुसार १० ते १२ अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक खालीक इनामदार करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT