कोल्हापूर

मातृभूमी हीच देशाची, राष्ट्राची आई

CD

लोगो ः विवेक व्याख्यानमाला
-----
10084
अंबप : येथील विवेक वाचनालयाच्या वतीने आयोजित विवेक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार. समोर श्रोते उपस्थित होते.
------
मातृभूमी हीच देशाची, राष्ट्राची आई
प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार ः ‘मराठी कवितेतील आई’वर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता.१६ : माता म्हणजे आई, आपण पिकवत असलेल्या काळ्या मातीला आई म्हणतो आणि या देशाची, राष्ट्राची आई म्हणजे मातृभूमी आहे, असे उद्‍गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (हलकर्णी) यांनी काढले.
अंबप येथील विवेक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतील विवेक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ‘मराठी कवितेतील आई’ याविषयी गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील होते.
डॉ. पोतदार म्हणाले, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, या ओळी जगात आईसारखे दुसरे ज्ञानाचे विद्यापीठ नाही, हेच सांगते. आईविना हे जग सुख शून्य आहे. जिच्या उदरी माझा जन्म झाला ती माता धन्य आहे.’ स्वर्गीय दादा कोंडके म्हणतात, ‘ज्याला आय नाय, त्याला काय नाय.’ अलीकडे आईची ‘मम्मी’ आणि बापाचा ‘डॅडी’ झाल्यामुळे नाती दुरावत गेली. याचा विपर्यास वृद्धाश्रम निर्माण झाली. आई आणि बाबा हाक मारताना आवाज बेंबीच्या देठापासून येतो; पण मम्मी , डॅडी म्हणताना ती आर्त ओढ, ओलावा जाणवत नाही. आजपासून अंबपमधील लहान मुलांनी आई-वडिलांना आई आणि बाबा म्हणून हाक द्यावी, हेच या वाचनालय व्याख्यानमाला चालवणाऱ्या संचालकांचे यश आहे.’ दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी विवेक वाचनालयात अखंडपणे ३८ वर्षे व्याख्यानमालेचे जागरण सुरू आहे. त्याची प्रशंसा, कौतुक केले.
माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, संदीप घेवारी, डॉ. दयानंद कांबळे, शिवकांत पाटील, नंदन महाबलया, संतोष भाट, गणेश नाटकर, बाळासाहेब पाटील, घुणकीचे संचालक अनिल मगदूम आदी उपस्थित होते. कार्यवाह विनायक माने यांनी स्वागत केले. विलास नाईक यांनी प्रास्ताविक केले. स्वाती जंगम यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT