कोल्हापूर

गारगोटी : आवशक सानिया सापळेची निवड

CD

3101 - सानिया सापळे
कनिष्ठांच्या जागतिक शूटिंग
स्पर्धेसाठी सानियाची निवड
गारगोटी, ता. ११ : येथील नेमबाज सानिया सुदेश सापळे हिची कोरिया येथे होणाऱ्या ज्युनिअर जागतिक चॅम्पियनशिप रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली. तेथे ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑलिंपिकनंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा समजली जाते. स्पर्धेत सुमारे ४० देशांतील नेमबाज सहभागी होणार आहेत.
तिने भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया ज्युनिअर ५० मीटर थ्री पोझिशन पॉईंट टू टू रायफल प्रकारात कांस्य पदक पटकाविले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने पाच वेळा पॉईंट टू टू ५० मीटर प्रोन रायफल शूटिंग चाचणी घेण्यात आली. त्यात तिने चांगली कामगिरी केल्याबद्दल तिची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रायफल शूटिंगसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दोन वर्षांतून एकदा घेतली जाते.
सानिया आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला इंद्रजित मोहिते, राधिका बराले, रत्नाकर देसाई यांचे मार्गदर्शन, तर केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, पर्यवेक्षक डॉ. ए. एम. मुजुमदार, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. विजय रोकडे यांचे सहकार्य लाभले.

फोटो : got111.JPG 3101 - सानिया सापळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT