कोल्हापूर

स्टेटस वरून वाद

CD

स्टेटसवरून दोन गटांत माणगावात हाणामारी
तीस जणांवर गुन्हा : १२ संशयितांना अटक

हातकणंगले, ता. १३ : माणगाव (ता. हातकणंगले) येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १२ संशयितांना अटक केली आहे.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी एका समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकी दरम्यानचा एक व्हिडिओ एका युवकाने स्टेटसवर ठेवला होता. या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. याबाबत दुसऱ्या समाजातील काही कार्यकर्त्यांनी त्या युवकाला त्याच्या दारात जाऊन मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून कार्यकर्ते पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच संबंधित समाजातील युवक मोठ्या संख्येने जमा झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह हातकणंगले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेत वाद मिटवला होता. मात्र, दोन्ही बाजूच्या काही हुल्लडबाजांनी एकमेकांवर दगडफेक करीत मिटवलेला वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सौम्य लाटीमार करीत पिटाळून लावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT