कोल्हापूर

रामलिंग परिसर प्लास्टिक मुक्त करणार

CD

रामलिंग परिसर प्लास्टिकमुक्त करणार
रामलिंग नेचर क्लबचा निर्धार : अलमप्रभूवर वृक्ष संवर्धन करण्याचाही निर्णय
सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. २ : पावसाळ्यापूर्वी रामलिंग अलमप्रभू परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार रामलिंग नेचर क्लबतर्फे घेतला. संघटनेतर्फे आयोजित एक दिवसीय मेळाव्यामध्ये हा निर्णय घेतला. त्याचबरोबर रामलिंग नेचर क्लब सक्रिय करीत पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
रामलिंग नेचर क्लब ही संघटना हातकणंगले तालुक्यातील रामलिंग या क्षेत्राच्या निसर्ग संवर्धनासाठी कार्य करीत आहे. संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची चर्चा करण्यासाठी निसर्गप्रेमींचा मेळावा झाला. यावेळी ट्रेकिंगमध्ये संघटनेचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ऊर्मिला पाटील यांनी योगासन तसेच मार्गदर्शन केले. चर्चेमध्ये प्रा. डॉ. अमर कांबळे, राजू गोरे, संदीप गुदले, आदींनी मनोगत व्यक्त केले. रामलिंग परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा असून, तो पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्‍यात आला. पावसाळ्यात वृक्ष दत्तक योजनेच्या माध्यमातून अल्लमप्रभू येथे वृक्षारोपणाचा निर्णय झाला. प्रास्ताविक रामलिंग नेचर क्लबचे प्रवक्ते संतोष वडेर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT