कोल्हापूर

मुख्य अंकासाठी आवश्यक

CD

2032
...
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आवाडेंचे कौतुक
चित्रफित व्हायरल : भाजप उमेदवारीबाबत इचलकरंजीत दिवसभर चर्चा
इचलकरंजी, ता. ८ : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्याची दखल घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव घेऊन कौतुक केले. त्याबाबतची चित्रफित शहरात व्हायरल झाल्यानंतर आमदार आवाडे यांना विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेने दिवसभर जोर धरला होता.
आमदार आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यांचे समर्थकही तितकेच कट्टर आहेत. समाजमाध्यमातून संधी मिळेल तेथे एकमेकांच्या विरोधात टिप्पणी करीत असतात. आव्हानात्मक भाषेचाही वापर करण्याची संधीही सोडत नाहीत. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी महायुतीचे उमेदवार माने यांना समर्थन दिले होते. आवाडे हे विधिमंडळातील भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. पण त्यानंतरही आवाडे - हाळवणकर यांच्यात गेल्या साडेचार वर्षांत कधीही दिलजमाई झाली नाही. उलट आजही कट्टरता कायम आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेवेळी आवाडे- हाळवणकर यांच्यातील नाराजीनाट्य जोरात चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर आज थेट फडणवीस यांनी इचलकरंजीतील मताधिक्याचा संदर्भ देत आमदार आवाडे यांचे नाव घेतले. यातून मताधिक्याचे श्रेय फक्त आवाडे यांना देण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. व्हायरल चित्रफितीसह समाज माध्यमात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. किंबहुना आमदार यांना भाजपची उमेदवारी निश्चीत झाल्याच्या चर्चेने जोर धरला.
....
भाजपच्या उमेदवारीबाबत उत्सुकता
आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.
विद्यमान आमदार आवाडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना डावलून माजी आमदार हाळवणकर यांना उमेदवारी दिली जाणार काय, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. भाजपच्या उमेदवारासाठी आवाडे- हाळवणकर यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT