कोल्हापूर

मुंबई सर्वोत्कृष्ट ठाणे सन्मान

CD

06679

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा
मुंबईत सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरव
इचलकरंजी, ता. १० : सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याला मुंबई येथे पोलीस अधिकारी अर्धवार्षिक परिषदेत सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पुरस्कार स्वीकारला. इचलकरंजीला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाल्याने राज्य पोलीस दलात इचलकरंजी पोलिस दलाचे नाव उंचावले आहे.
महाराष्ट्र पोलिस दलातर्फे २०२१ वर्षासाठी गुन्हे उघडकीस आणणे, निर्गती, दोषसिद्धी, प्रशासन, आस्थापना, जनसंपर्कसारखे विविध निकष शिवाजीनगर पोलिस ठाण्याने पूर्ण केले. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जाहीर झालेल्या पाच पोलीस ठाण्यांपैकी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आला. महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालय, कुलाबा येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्धवार्षिक परिषद आज पार पडली. यामध्ये शिवाजीनगर पोलिस ठाणे सन्मानित झाले. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पोलीस आणि नागरिक परस्परपूरक आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवून पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा. समाजघटकांशी योग्य समन्वय साधला तरच अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिषदेत व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
2021 साली श्रीकांत पिंगळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या कार्यकाळात दिवसासह रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगवर भर, गुन्हेगारीवर आणलेले नियंत्रण, प्रत्येक आठवडी बाजारात खाकी वर्दीतील पोलिसाची नेमणूक करून कमी आलेल्या चोऱ्या, डिजीटल कर्मचारी यासह पोलीस ठाण्याचे रुपडे पालटत अनेक प्रभावी कामे केली. या वर्षातील कामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. विविध निकषाद्वारे या कामाची तपासणी करून राज्य पोलीस दलाने शिवाजीनगर पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा प्रथम पुरस्कार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT