कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी अंगणवाडी सेविकांची निदर्शने

CD

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी
अंगणवाडी सेविकांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : वारंवार आंदोलने करूनही मागण्या बेदखल, दोन वेळा बोलावूनही रद्द केलेली बैठक, विविध मागण्यांबाबत शासनाची उदासीनता याविरोधात अंगणवाडी सेविका व मदतनीस १५ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१५ जुलैला राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी होणार आहेत. मोर्चा, जेलभरो, धरणे, आमरण उपोषण, रस्ता रोको अशी विविध आंदोलने ठिकठिकाणी केली जाणार आहेत. यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस नाइलाजास्तव बेमुदत संपावर जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मासिक सभा, शासकीय बैठकांवर बहिष्कार टाकला जाणार आहे.
मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅच्युईटी अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ५२ दिवसांचा संप करून वारंवार आंदोलने केली. दरम्यान महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मानधनवाढीसाठी पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर लोकसभेच्या आचारसंहिता लागली आणि त्यानंतर दोन वेळा बोलावलेली बैठकही रद्द केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. आता आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका युनियनच्या सरचिटणीस जयश्री पाटील यांनी मांडली.
यावेळी शोभा भंडारे, मंगल गायकवाड, अनिता माने, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
...
आम्ही सावत्र बहिणी काय?
गर्भवतींपासून मुलांच्या संगोपनापर्यंतचे सर्व काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. राज्यातील दोन लाख अंगणवाडी ताईंच्या या कामाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यांनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम लावले आहे. मग आम्ही सावत्र बहिणी आहोत काय? असा संतप्त सवाल यावेळी अंगणवाडी सेविका सुरेखा कोरे यांनी राज्य शासनाला केला.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT