कोल्हापूर

जयसिंगपूरला शरद कृषी प्रदर्शन आजपासून

CD

जयसिंगपूरला शरद कृषी प्रदर्शन आजपासून

जयसिंगपूर, ता. ८ : सहकाररत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे व शरद कृषी महाविद्यालय यांच्या विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराशेजारील जागेत ९ ते १२ फेब्रुवारीअखेर राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याची महिती, आमदार आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कृषी प्रदर्शनाचा इव्हेंट रिसोर्सेस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांगली यांच्या माध्यमातून होणार आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये या कृषी प्रदर्शनात १५ कंपन्यांच्या ट्रॅक्टरचे स्टॉल तसेच गाय, म्हैस, बैल यांच्या प्रदर्शनातील समावेशासह द्राक्ष, हळद व ऊस पीक स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. लोकोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करून शेतीमध्ये विविध प्रयोग करून पिकांचे उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रदर्शनामध्ये तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन, क्षारपड जमिनीमधून पीक उत्पादन, आंबा, झेंडू, पपई यासारख्या अनेक पिकांच्या उत्पन्नाबाबत मार्गदर्शन, ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी, बीट गोड ज्वारी आणि ओला कचरा यापासून इथेनॉल निर्मिती, मशरूम उत्पादन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन होणार आहे. प्रदर्शनास ३५० स्टॉलधारक सहभागी होणार आहेत असे सांगताना हार्वेस्टर, ड्रिप इरिगेशन, शेती विषयक अवजारे, यंत्रसामुग्री, बि बियाणे, फर्टीलायझर, हरितगृहे, जैव विज्ञान, मत्स्यवस्थापन, पशु पैदास, कुक्कुटपालन, डेरी मशिनरी, अन्नधान्य साठवन प्रक्रिया यांची माहिती देणाऱ्या स्टॉलबरोबरच शेतकऱ्यांविषयी सरकारी योजना, वेगवेगळ्या कंपन्यांची धोरणे, अनुदान, आणि पिक विमा याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT