कोल्हापूर

फसवणूक

CD

महिलेची १८ लाखांची फसवणूक

जयसिंगपूर, ता.१०: फ्री टॅक्स वापरून युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केल्याने एका सबस्क्राइबरला १५० रुपये मिळतील, असा विश्वास संपादन करून प्रगती महेश कुरणे (वय ३६, सध्या रा. दुसरी गल्ली, जयसिंगपूर, मूळगाव नदीवेस, मिरज, जि.सांगली) या बँक कर्मचारी महिलेची १८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञातावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जून ते ३० जून या मुदतीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रगती कुरणे यांना २० जून ते ३० जूनच्या दरम्यान अज्ञात मोबाईलधारकाने फ्री टॅक्स वापरून युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केल्याने एका सबस्क्राइबरला १५० रुपये मिळतील, असे सांगून फ्री टास्क वापरण्यास सांगून ६५० रुपये पाठविले आणि कुरणे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रिपेड टास्क वापरण्यास भाग पाडून कुरणे यांच्या बँक खात्यातून आरटीजीएस, एनइएफटी, युपीआय व बँकेच्यामोबाईल अ‍ॅपमधून संशयित आरोपीच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर १८ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर ही रक्कम कमिशनसह परत देतो, असे सांगून कुरणे यांची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT