‘कला श्रावण-२०२३’चे आयोजन
जयसिंगपूरला शनिवारी, रविवारी प्रदर्शन-विक्री ः ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.२६ : येथील इनरव्हील क्लबच्यावतीने ‘कला श्रावण-२०२३’ चे आयोजन केले आहे. याअंतर्गत ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दिवशी शहरात चौथ्या गल्लीतील इंगळे सभागृहात सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ यावेळेत फॅशन, गृह सजावट, क्राफ्ट, ज्वेलरी अशा नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन खुले राहणार आहे. यात ६० हून अधिक विविध प्रकारचे स्टॉल्स मांडले जाणार आहेत. शिवाय दर दोन तासांनी लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यातील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.
''सकाळ'' प्रदर्शनाचे माध्यम प्रायोजक असणार आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन होणार आहे. शनिवारी (ता.३०) अर्चना नाईक फ्री हेअर अँड मेकअप डेमो सादर करणार आहेत. सीमा जैन या दांडिया आणि गरब्याचे प्रशिक्षण देणार आहेत.
रविवारी (ता.१) अश्विनी इंगळे फ्री साडी ड्रोपिंग डेमो सादर करणार असून क्ले फ्रुट बास्केट मेकिंग स्पर्धा होणार आहे. खास दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या देवतांच्या थ्रीडी फ्रेम्स, आर्ट्सच्या विविध वस्तू, तोरण सिरामिक्स तसेच घर आणि घरातील प्रत्येकांसाठी लागणाऱ्या विविध वस्तू या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
खास करून महिलांच्या उद्योजकतेला वाव देण्यासाठी या खरेदी महोत्सवाचे आयोजन केले आहे. बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, सांगली येथून विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध होणार आहेत. खवय्यांसाठी स्पेशल मेन्यूचे फुड्स स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शिल्पा आडदंडे, वसुंधरा कोले, डॉ. नीलम बिरनाळे, डॉ. वंदना कचरे, रूपा खोत, डॉ. सीमा जैन, डॉ. भारती पवार, डॉ. वसुंधरा घोडके, डॉ. प्रतिभा चौगुले, अश्विनी पाटील, सविता मगदूम, पल्लवी पाटील, विद्या चौगुले, माधवी कोठावळे, तृप्ती खामकर, अर्चना विभुते आदी प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.