कोल्हापूर

जयसिंगपूर अ‍ॅडव्होकेट्स बारसाठी शनिवारी मतदान

CD

जयसिंगपूर अ‍ॅडव्होकेट्स बारसाठी शनिवारी मतदान
वचननाम्यात आश्वासने ः अ‍ॅड. पाटील-अ‍ॅड. आत्तार पॅनेलमध्ये लढत
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३० : जयसिंगपूर अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अ‍ॅड. तारक आत्तार पॅनेल आणि अ‍ॅड. धनंजय पाटील पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.
२४ आणि २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर २९ एप्रिलला माघारीची मुदत संपली. यानंतर दोन्ही पॅनलमध्ये सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाले. चार मे रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन या वेळेत नवीन न्यायालयाच्या इमारतीत मतदान होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, महिला प्रतिनिधी आणि कार्यकारिणी सदस्य यातून निवडले जाणार आहेत. अ‍ॅड. धनंजय पाटील पॅनेलमध्ये धनंजय पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार असून, उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. सुशीला घाटगे, सचिव पदासाठी अ‍ॅड. स्वप्नील अलगुरे, खजिनदार पदासाठी अ‍ॅड. वैभव कुपवाडे, महिला प्रतिनिधी म्हणून ॲड भाग्यश्री जोशी, तर अ‍ॅड. अनिकेत भंडारे, अ‍ॅड. सुमेधा चौगुले, अ‍ॅड. समर्थ चव्हाण, अ‍ॅड. ऐश्वर्या मगदूम कार्यकारिणी सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अ‍ॅड. तारक आत्तार पॅनेलमध्ये अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. तारक अत्तार, उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. सुनील म्हाळुंगेकर, सचिव पदासाठी अ‍ॅड. भास्कर माने, खजिनदार पदासाठी अ‍ॅड. उत्कर्ष बिरनाळे, महिला प्रतिनिधीसाठी अ‍ॅड. प्रेमलता बोटांकडे, तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी अ‍ॅड. यशोदा कांबळे, अ‍ॅड. मुदस्सर शेख निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दोन्ही पॅनेलकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बारमध्ये इंटरनेट फ्री वाय-फाय सुविधा, कॉम्प्युटरसाठी दोन लीगल सॉफ्टवेअर घेणे, लायब्ररी अद्ययावत करणे, ई-फायलिंग सेंटर सुरू करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, महिला वकिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सेशन कोर्टामध्ये लिफ्टची मागणी करणे, वकिलांसाठी वन टाइम प्रीमियम इन्शुरन्स, वकिलांसाठी आकस्मिक निधी उभारणे आदी आश्वासने दिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT