कोल्हापूर

आंध्र प्रदेशचे ९६ पोलिस शिरोळमध्ये

CD

07894
कुरुंदवाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमधून दाखल झालेले पोलिस कर्मचारी.
-----------
आंध्र प्रदेशचे ९६ पोलिस शिरोळमध्ये
लोकसभा निवडणूक; आणखी पाचशे होणार दाखल
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्यात आंध्र प्रदेशमधील ९६ विशेष पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्यांत या तुकड्या दाखल झाल्या आहेत.
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, पाचवा मैल, शिवनाकवाडी आणि उदगाव अंकली टोलनाका येथे ते पोलिस तपासणी नाक्यावर कार्यरत झाले आहेत. याचबरोबर शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावागावांत संबंधित पोलिस ठाण्यामार्फत आंध्रप्रदेश पोलिसांच्या माध्यमातून रूट मार्च सुरू केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील शांतता व व्यवस्था राखण्यासाठी संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात पोलिस यंत्रणा कार्यरत केली आहे. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत. यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडत असून, आंध्रप्रदेश विशेष पोलिसांचे पथक शिरोळ तालुक्यात दाखल झाले आहे. ७ मेपर्यंत हे पोलिस शिरोळ तालुक्यात कार्यरत असणार आहेत. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत सुमारे ४०० ते ५०० पोलिसांचा जादा फौजफाटा शिरोळ तालुक्यात दाखल होणार आहेत.
--------------
महसूल, पोलिस प्रशासनाला दिलासा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्याचा विस्तार आणि मतदान केंद्रे लक्षात घेता आंध्र प्रदेशमधील पोलिसांची मदत महसूल आणि पोलिस प्रशासनाला महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ९६ पोलिस कर्मचारी शिरोळ तालुक्यात दाखल झाले असले तरी आणखी दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर फौजफाटा दाखल होणार आहे. सध्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड पोलिस ठाण्यात पुरेशा मनुष्यबळाअभावी पोलिसांची कुचंबना होत आहे. निवडणुकीच्या काळात पोलिस यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आंध्रप्रदेशच्या पोलिसांचा फौजफाटा तालुक्यातील यंत्रणेच्या मदतीला सरसावला आहे.
....

आंध्र प्रदेशमधील पोलिसांची पहिली तुकडी तालुक्यात दाखल झाली आहे. आणखी दोन दिवसात अधिकारी आणि कर्मचारी दाखल होतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया होण्यासाठी आंध्रप्रदेशच्या पोलिसांची मदत होणार आहे. संवेदनशील गावांवर यंत्रणेचे लक्ष असणार आहे.

-सत्यवान हाके, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT