कोल्हापूर

मिळकती वाढल्या; वसुलीची टक्केवारीही वाढावी

CD

मिळकती वाढल्या; वसुलीची टक्केवारीही वाढावी
जयसिंगपूरला ९२५ मिळकतींची भर; सहा कोटी ७३ लाखांवर कर

गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ७ : शहरात १२ हजार १४४ मिळकती होत्या. यातून पालिकेला ४ कोटी ६२ लाख रुपयांचा कर मिळत होता. नव्याने ९२५ मिळकतीची भर पडली आहे. मिळकतींची संख्या आता १३ हजार ६९ वर गेली आहे. वाढीव मिळकतींमुळे कराची रक्कम ६ कोटी ७३ लाखांवर पोहोचली आहे. आता प्रशासनाची नियोजनाने वसुलीची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी आहे.
अखीव-रेखीव असलेल्या जयसिंगपूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पालिकेने शहरातील मिळकतीची नव्याने मोजणी केली. यावर हरकती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरातील मिळकतधारकांची संख्या वाढली आहे. याप्रमाणे पालिकेने रहिवासी १५ टक्के वाढ केली असून कर्मिशिअलला २० टक्के करवाढ केली आहे. त्यामुळे पालिकेची चतुर्थ वार्षिक कर आकारणी यादी मंजूर झाली आहे. यात पालिकेच्या एकूण १३ हजार ६९ मिळकतधारकांना २०२३-२४ साठी मालमत्ता कर प्रारूप मागणी ४ कोटी ५० लाख अधिक चतुर्थ वार्षिक कर आकारणीनुसार झालेली वाढ २ कोटी १५ लाख असे मिळून ६ कोटी ६५ लाख कर झाला आहे. मागील वर्षपर्यंतची थकीत येणेबाकी २ कोटी १० लाख असून यांचे एकूण रुपये ८ कोटी ७५ लाख वसूल करण्याचे पालिकेला आव्हान आहे. यापैकी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मागील ३५ लाख व चालू २ कोटी २५ लाख असे मिळून २ कोटी ६० लाख वसूल झाले आहेत.
....

वसुली नाही तर अनुदान नाही
पालिकेला २०२३-२४ वर्षासाठी देयक असलेले मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळा भाडे वसुली मोहीम सुरू केली होती. शासनाकडून वसुलीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेशही पालिकेला दिले होते. प्रशासनाने विनंती, पाठपुरावा करत कठोर भूमिका टाळली होती. निर्धारित वेळेत शंभर टक्के वसुली झाली नाही तर पालिकेला कोणतेही अनुदान मिळणार नाही अशा सक्त सूचना शासनाकडून दिल्या होत्या. भविष्यात वसुलीच्या प्रमाणावरच अनुदान देण्याचे संकेत आहेत.
....

वाढीव मिळकतीमुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. येणाऱ्या काळात वसुलीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेईल.
-टिना गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक, जयसिंगपूर पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT