कोल्हापूर

कळे: एसटी व मासे वाहतूक करणाऱ्या चारचाकीची धडक: सातजण जखमी.

CD

03125

कळे: कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील खेरीवडे (ता.पन्हाळा) फाट्यानजीक एसटी व मासे वाहतूक करणाऱ्या चारचाकीची धडक झाली. यामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान झाले.
...

खेरीवडे फाट्याजवळ एसटी- चारचाकीचा अपघात

दोन्ही चालकांसह प्रवासी मिळून सातजण जखमी

कळे, ता.२: मासे वाहतूक करणाऱ्या चारचाकीने एसटीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही चालक व प्रवासी मिळून सातजण जखमी झाले. दोन्ही वाहनांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटी चालक शशिकांत भगवान कांबळे (वय ३९, रा. वाकरे, ता. करवीर) यांनी तात्यासो आनंदा पोवार (रा. नाडे, ता. पाटण, जि. सातारा) याच्या विरोधात कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खेरीवडे (ता.पन्हाळा) फाट्यानजीक सोमवारी (ता.१) ही घटना घडली.
रंकाळा आगारातून एसटी (एम.एच.१४ बी.टी.३४०५) मध्ये प्रवासी भरून चालक शशिकांत कांबळे हे गगनबावडा येथे निघाले होते. दरम्यान, मासे वाहतूक करणारी चारचाकी (एम.एच.४३ बी.एक्स ९७७२) ही रिकामी गाडी घेऊन तात्यासो पोवार हे कोकणातून कोल्हापूरकडे निघाले होते. दुपारच्या सुमारास खेरीवडे फाट्याजवळ दोन्ही गाड्या समोरसमोर आल्या. यावेळी पोवार हे गाडी चुकीच्या बाजूने चालवत होते. त्यांच्या चारचाकीने एसटीला जोराची धडक दिली. यात एसटीचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. तर चारचाकी गाडी चक्काचूर होऊन तीन लाखांचे नुकसान झाले. एसटी चालक शशिकांत कांबळे, वाहक वनिता अमर पाटील (रा.पोहाळे तर्फे बोरगाव, ता. पन्हाळा), चारचाकी चालक तात्यासो पोवार यांच्यासह प्रवासी पांडुरंग तुकाराम पाटील (रा. तळये बु., ता. गगनबावडा), उमेश बाळकृष्ण सावंत (रा. तिसंगी, ता. गगनबावडा), निखील शिवाजी पडवळ (रा.खोकुर्ले पैकी पडवळवाडी, ता. गगनबावडा), संदीप शिवाजी बुवा (रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) हे जखमी झाले. कळे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. हेड कॉन्स्टेबल सुशांत धनवडे अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT