कोल्हापूर

कबनूर नगरपरिषद, आरोग्य केंद्रास मिळणार गती

CD

कबनूर नगरपरिषद, आरोग्य केंद्रास मिळणार गती
अधिवेशनात आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून प्रश्‍न उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ११ ः अर्थसंकल्पीय अधिवेशनात कबनूर स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा प्रश्न आमदार प्रकाश आवाडे यांनी मांडल्याने कबनूर नगरपरिषदेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर कबनूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याचा प्रश्‍न मांडल्याने हे दोन्ही प्रश्‍न सुटण्यासाठी गती मिळणार आहे.
आमदार आवाडे म्हणाले, ‘कबनूर हे इचलकरंजी महानगरपालिकेला लागून असलेले व ७० हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. ५० हजार लोकसंख्या झाली की त्या गावची नगरपरिषद करायची असा कायदा आहे. मात्र कबनूर नगरपरिषद करण्याबाबत वारंवार मागणी करूनही होत नाही.’
कबनूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत ते म्हणाले, ‘कबनूरची ७० हजार लोकसंख्या असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांना सहा किमीवर साजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी जावे लागते. लोकसंख्या विचारात घेता येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ मंजूर करावे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT