कोल्हापूर

कसबा सांगाव: इचलकरंजी पाणी योजने विरोधात १७ फेब्रुवारी रोजी पाणी परिषद, सुळकूड धरणावर नदीकाठावरील ४४ गावचे ग्रामस्थ सहभागी होणार.

CD

सुळकूड धरणावर १७ ला पाणी परिषद

दूधगंगा बचाव कृती समिती ः योजनेला विरोध करण्याचे आवाहन

कसबा सांगाव, ता. ८ ः सुळकूड धरणावरून प्रस्तावित इचलकरंजी पाणी योजनेला नदीकाठच्या गावांचा विरोध तीव्र होत आहे. सुमारे १५६ कोटी रुपयांच्या थेट पाईपलाईन योजनेसाठी इचलकरंजी पालिकेला निविदा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. १७) सुळकूड धरणावर ‘पाणी परिषदे’ चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत कसबा सांगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. पाणी परिषदेसाठी दूधगंगा काठावरील सुमारे ४४ गावांतील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व सीमाभागातून हजारो सीमावासीय उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत बोलताना सरपंच ॲड. वीरश्री जाधव म्हणाले, ‘इचलकरंजी पाणी योजनेसाठी ज्या ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत, त्यांची अनामत रक्कमही वाया जाणार आहे. या योजनेच्या विरोधात नदीकाठ एकवटला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना रद्द झाली पाहिजे. १५६ कोटी रुपयांचा निधी पंचगंगा नदी शुद्धिकरणासाठी वापरावा. परिषदेसाठी नदीकाठच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला विरोध दर्शवावा.’
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या माथी ही योजना मारून काही लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या मदतीने आपली लोकप्रियता वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी केला. येत्या काही दिवसांत प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या भेटी घेऊन मोठ्या ताकदीने लढा उभारण्यात येईल, असेही नियोजन केल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. बैठकीस उपसरपंच प्रवीण माळी, माजी उपसरपंच विक्रमसिंह जाधव, धनराज घाटगे, विक्रमसिंह माने, बाबय्या स्वामी, अमोल शिवई, ग्रा.पं.सदस्य अरविंद माळी, सुदर्शन मजले, अमर शिंदे, मनोज कोडोले, सुरेश लोखंडे, विनोद आवळे, अविनाश मगदूम, प्रभू भोजे, रोहिदास कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT