कोल्हापूर

कसबा सांगाव: उर्दू शाळेला गळती, प्रशासनाचे दुर्लक्ष, तात्काळ उपाययोजना करण्याची गरज

CD

01264
कसबा सांगावच्या उर्दू शाळेला गळती
बचावासाठी ताडपत्रीचा वापर; तातडीने उपाययोजनांची मागणी

कसबा सांगाव, ता.२६ : येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू विद्यामंदिर शाळेला गळती लागली आहे. यामुळे सातवीचा वर्ग मुस्लिम समाज सभागृहात भरविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शिक्षक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

मशीद परिसरात २००९ मध्ये शाळेचे बांधकाम झाले. पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या षटकोनी शाळेत ३९ विद्यार्थी शिक्षण घेतात. मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षक अध्यापन करतात. एका खोलीत पहिली, तिसरी, दुसऱ्या खोलीत पाचवी, सहावी, कार्यालयात सातवीचा वर्ग तर आठवीचा वर्ग बाजूच्या खोलीत भरतो. सध्या पावसामुळे कार्यालयात पाणी ठिबकत आहे. पाण्यापासून बचाव करण्यासाठी ताडपत्रीचा आसरा स्लॅबला दिला आहे. पाणी साठविण्यासाठी डस्ट बिन लावले आहेत. बाजूच्या दोन्ही खोल्यांत स्लॅबमधून बारीक गळती सुरू आहे. ठिकठिकाणी स्लॅबचा गिलावा निखळला आहे. काही ठिकाणी स्लॅब आणि बाहेरील बाजूस तडे गेले आहेत. आठवीच्या वर्गात जाण्यासाठी रस्ता नाही. दलदल आणि चिखलातून विद्यार्थ्यांची ये-जा सुरू आहे. बांधकामानंतर दहा-बारा वर्षांतच गळती लागणे, तडे जाणे असे प्रकार सुरू झाल्याने बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोट
पंचायत समितीकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. अजून कामे अपूर्ण आहेत. सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. आठ दिवसांत काम पूर्ण करू, असे आश्वासन मिळाले आहे.
- जैनब पटेल, मुख्याध्यापिका

दोन दिवसांपूर्वी शाळेची पाहणी केली. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. दहा-बारा वर्षात शाळेची अशी अवस्था झाल्यानेच बांधकामाचा दर्जा स्पष्ट होतो. निधी मिळेल तशी उपाययोजना करू.
- ॲड. वीरश्री जाधव, सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT