कोल्हापूर

कसबा सांगाव: आरोग्य केंद्राच्या समोरील कचऱ्याचा ढीग केला साफ, सकाळ बातमीचा परिणाम

CD

लोगो ः सकाळ इफेक्ट

01336

आरोग्य केंद्र परिसराची
कसबा सांगावला सफाई

कसबा सांगाव, ता. ११ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासाठी उभारलेल्या संरक्षक भिंतीनजीक कचऱ्याचा ढीग हटवून ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
येथे आरोग्य केंद्रानजीक पडलेल्या कचऱ्यामुळे नऊ गावांतून येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्य केंद्राचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत ‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. सफाई कर्मचाऱ्यांनी संरक्षक भिंतीसमोरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येच्या येथील आरोग्य केंद्रांतर्गत नऊ गावांसह उपकेंद्रेही सुरू आहेत. परप्रांतीय कामगार आणि कुटुंबीयांची रुग्णालयात गर्दी असते. सकाळी शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी होते. आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ संरक्षक भिंतीसमोर प्लास्टिक, पिशव्या, कागद, पत्रावळ्या, द्रोण, पोती, कुजलेले अन्न, पालापाचोळा, झुडपे यांचा ढीग अनेक दिवसांपासून होता. कचऱ्यात मध्यभागी पाण्याचा व्हॉल्वही होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पदाधिकारी बैठकीसाठी महिन्यातून एकदा आरोग्य केंद्रात येतात; मात्र कचऱ्याने होत असलेल्या स्वागताकडे त्यांचेही दुर्लक्ष झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT