कोल्हापूर

पाटगाव प्रकल्पाने गाठला तळ,२२ टक्के पाणीसाठा

CD

01056
धरण कोरडे, डोळे ओले...

आस पाण्याची, आशा पावसाची

आठ हजार हेक्टरमधील
पिके तहानलेलीच

पाटगाव धरण कार्यक्षेत्र; २२ टक्के साठा, पाणीटंचाईचे सावट

कडगाव, ता. १७ : भुदरगड तालुक्यातील पाटगावमधील मौनीसागर जलाशयाची पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. अनेक वर्षांत पाणी कमी होण्याचा हा विक्रम नोंदविला आहे. धरणात २२ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाटगाव धरण क्षेत्रातील आठ हजार हेक्टर क्षेत्र शेतीसह शेकडो गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. पाटगाव धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने प्रथमच काही भाग दिसू लागला आहे.
तालुक्यातील पाटगांव मध्यम प्रकल्पात बावीस टक्के, कोंडूशी, वासनोली, फये पाच टक्के, नागणवाडी पंधरा टक्के पाणीसाठा असल्याने प्रकल्पच कोरडे पडले आहेत. लघु प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यात पाण्याची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. जूनअखेर पाऊस सुरु न झाल्यास भीषण पाणीटंचाई निर्माण होईल,अशी स्थिती आहे. तालुक्यात पाटगांव मुख्य धरण आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह कर्नाटकचा काही भाग या प्रकल्पावर अवलंबून आहे. या प्रकल्पांतर्गत आठ हजार हेक्टर क्षेत्र शेतीसाठी अवलंबून आहे. शेकडो गावे पिण्याच्या पाण्यासाठी आसुसले आहेत. यावर्षी कडक उन्हाळा, वळीव पावसाचा अभाव यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत गेली. यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत गेला. मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. पाऊसच नसल्याने शेतकरी आभाळाकडे नजर लावून बसला आहे.

कोट .
पाटगाव मध्यम प्रकल्पात २२.७३ टक्के साठा आहे. ३१ जुलैअखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून ठेवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. एक जूनपासून आजअखेर ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाने ओढ घेतली असली तरी प्रशासनाने पाण्याची योग्य नियोजन केले आहे.
- मनोज देसाई, शाखा अभियंता पाटगाव प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT