कोल्हापूर

हत्तीचा मुक्काम दहा दिवस.. शेतकरी आक्रमक

CD

01072
...

अंतुर्ली- शिवडाव परिसरात
हत्तीकडून पिकांचे नुकसान

दहा दिवसांपासून मुक्कामः शेतकऱ्यांकडून वनविभागाचे कर्मचारी धारेवर

कडगाव, ता.१०: अंतुर्ली- शिवडाव (ता.भुदरगड) येथे हत्तीकडून पिकांचे मोठे नुकसान केले जात आहे. तब्बल दहा दिवस हत्ती या परिसरात धुमाकूळ घालत आहे. वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
आज अंतुर्ली येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. हत्तीपासून दररोज होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसेल तर आम्हा ग्रामस्थांना हत्तीला हाकलण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. या परिसरात भातरोप लागणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. परंतु हत्तीचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तीच्या भीतीने शेतीची कामे खोळंबली आहेत.
अंतुर्ली - शिवडाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. चिखल, दाट धुक्यामुळे हत्तीला हाकलणे अडचणीचे ठरत आहे. या विभागात फणस, मेसकाठी कोंब असल्याने हत्तीला पूरक खाद्य उपलब्ध आहे. यामुळे हत्तीने मुक्काम वाढवला आहे. हत्तीकडून होत असलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. हत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वनरक्षक योगेश पाटील, इजेस पिंटो, विजय शिंदे, मनोज पाटील, तुकाराम लाड, गणेश बेलेकर, वैभव रेपे, मिलिंद कांबळे यांचे पथक हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
...

‘तब्बल दहा ते बारा दिवस हत्तीकडून ऊस व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभाग हत्तीचा बंदोबस्त करण्यात हतबल झाला आहे. वन विभागाने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन हत्तीचा बंदोबस्त करावा.

रामदास देसाई, सरपंच, अंतुर्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT