संघाकडे दररोज १७ लाख लिटर दूध संकलन होत असून दररोज १४ लाख लिटर दुधाची विक्री होते.
कुडित्रे : गोकुळने राज्यात सर्वाधिक गाय दुधाचे (Cow Milk) अनुदान अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून, गाय दूध अनुदान सर्वात जलद गतीने काम करणारा गोकुळ एकमेव सहकारी संघ आहे. शासनदरापेक्षा गाय दूध दरात सहा रुपये जास्त देत असून, महाराष्ट्रात गोकुळ संघ सर्वाधिक म्हैस व गाय दूध दर देत आहे. दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात वाढ केली असून, गोकुळच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘गोकुळ केसरी’ कुस्ती स्पर्धा भरविणार असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी जाहीर केले.
‘गोकुळ’च्या ६१ व्या वर्धापन (Gokul Dudh Sangh) दिनानिमित्त जिल्हा, तालुकास्तरावर क्रमांक आलेल्या दूध संस्थांचा, दूध व दुग्धजन्य वितरक यांच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्ष डोंगळे म्हणाले, ‘गोकुळला ७३०३ संस्था दूधपुरवठा करत असून, ५२०६ सभासद आहेत. संघाकडे दररोज १७ लाख लिटर दूध संकलन होत असून दररोज १४ लाख लिटर दुधाची विक्री होते. जातीवंत म्हैस खरेदीसाठी ४० हजार रुपये अनुदान करण्यात आले असून गोकुळ श्री साठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले.
दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकुळ कट्टा’ प्रचार प्रसिद्धीसाठी सुरू केला जाणार असून नजीकच्या काळात गोकुळचा पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे.’ ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी संघाच्या विकासाचा आढावा घेतला. अजित नरके यांनी अमृतसिद्धी हॉल व गोकुळचे ऋणानुबंध असल्याचे सांगितले. यावेळी बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, अमर पाटील, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, आर. के. मोरे, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर उपस्थित होते. आभार शशिकांत पाटील यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.