कोल्हापूर

बालिंगे तलाठी कार्यालयास टाळे ठोक आंदोलनाचा इशारा

CD

...अन्यथा तलाठी कार्यालयास टाळे ठोकू
बालिंगा ग्रामस्थांचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ४ : शालेय विद्यार्थ्यांना दाखले वेळेवर मिळत नाहीत. तसेच बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात. याबाबत बालिंगे सजातील तलाठी यांची तत्काळ बदली करावी, अन्यथा तलाठी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करू, असा इशारा बालिंगा ग्रामस्थांनी दिला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, बालिंगे (ता. करवीर) सजातील तलाठी वारंवार गैरहजर राहतात. शेतकरी शेती उताऱ्यासाठी आले असता त्यांना नीट उत्तरे मिळत नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडील कामाचे कारण सांगून कार्यालय बंद ठेवतात. शालेय विद्यार्थ्यांना दाखले वेळेवर मिळत नाहीत. याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, संबंधितांची बदली करावी. अन्यथा ग्रामस्थांतर्फे तलाठी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल.
याबाबत बालिंग्याचे सरपंच सुधा वाडकर म्हणाले, ‘‘बालिंगा गावचे क्षेत्र मोठे आहे. तलाठी उपस्थित नसतात. वेळेवर दाखले, उतारे मिळत नाहीत. बालिंगा गावासाठी स्वतंत्र तलाठी मिळावा.’’
याबाबत तलाठी किरण पाटील म्हणाले, ‘‘मी नेहमी चावडीत उपस्थित असतो. साबळेवाडी, दोनवडे सजाचा अतिरिक्त कार्यभार आहे. दोन्ही गावांत जावे लागते. सर्व दाखले वेळेवर दिले जातात. ५६ लाभार्थ्यांची पेन्शन मंजुरी पत्र वाटप केली आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT