कोल्हापूर

दिवसभर हेरगिरी, रात्रभर चोरीमारी

CD

चोरट्याचे क्लिपार्ट टाकावे....
.........................................
दिवसभर हेरगिरी, रात्रभर चोरीमारी

बाहेरगावी जाताय? थोडं सांभाळूनच... ः कागलमध्ये बंद घरेच चोरट्यांचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
कागल ता. २ : वर्षभरात अनेकवेळा कागल आणि परिसरात घरफोड्या व चोऱ्यांचे प्रकार घडत आहेत. मोटारसायकल चोरीबरोबर घरफोडीचे प्रकार सुरू आहेत. महिनाभरात दोन घरफोडी झाल्या. बंद घरे हेच चोरट्यांचे लक्ष्य आहे. घराचा कडीकोयंडा उचकटून किंवा खिडकीचे गज वाकवून चोरीचा प्रकार घडला आहे. गेल्या सहा महिन्यांत पाच घरफोड्या, तर १४ चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये ११ मोटारसायकली चोरीला गेल्या. सतत होत असलेल्या चोरी व घरफोड्यांच्या प्रकारांमुळे कागल शहरात चोरटे मोकाट सुटल्याचे दिसत आहे, तर पोलिसांच्या गस्तीबाबत नागरिकांतून शंकेची पाल चुकचुकत आहे.
गेल्या वर्षभरात चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. बंद घरे हेच चोरट्यांचे लक्ष्य आहे. बंद घराचा कडीकोयंडा उचकटायचा किंवा तोडून घरात प्रवेश करायचा आणि बिनधास्त चोरी करून जायचे, असा चोरट्यांचा नित्यनियम होऊ लागला आहे. अनेक नागरिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कागल शहरात तर कोणी उपनगरात घरही बांधून वास्तव्यास आहेत. नोकरदार लोक सुटीच्या दिवशी, कार्यक्रमाच्या किंवा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेरगावी जातात. यावेळी ते घराला कुलूप लावून जात असतात. चोरटे नेमके दिवसभर अशीच बंद घरे, बंगले हेरून त्या घरात चोरी करतात.
घराचा कडीकोयंडा उचकटून किंवा खिडकीचे गज वाकवून आतमध्ये चोरटे प्रवेश करतात. घरात जाऊन बिनधास्तपणे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड ते लंपास करत आहेत. चोरीमध्ये घरातील सर्व लोखंडी कपाटे कटावणीने फोडून चोरी केल्याचे दिसून येते. चोऱ्यांमध्ये तपासकामात श्वानपथकही घराच्या आसपासच घोटमळते, त्यावरून एकेकाळचे चोरट्यांचा कर्दनकाळ ठरणारे श्वानपथकही निष्प्रभ ठरत आहेत. शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास या चोरट्यांनी केल्याचे दिसून येते. सर्व भागात सतत होत असलेल्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कागल शहरात चोरटे वस्तीला आहेत की काय? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे.
.......
सहा महिन्यांत चोरी झालेली ठिकाणे ः
शहरातील दत्त कॉलनी, श्रमिक वसाहत, अखिलेश पार्क, शाहू कॉलनी, यशिला पार्क, अनंत रोटो वसाहत या उपनगरांसह सोमवार पेठ, सांगाव नाका परिसरात चोरीच्या घटना घडल्या.
...
त्यांनी देवही चोरले
शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून बंद घरे, बंगले फोडले आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवरही डल्ला मारला जात आहे. चोरट्यांच्या नजरेतून देवही सुटलेले नाहीत. देवांच्या मूर्तीबरोबरच पूजेचे चांदीचे साहित्यही चोरीला जात आहेत. मंदिरातील दानपेट्या फोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
....
सहा महिन्यांतील घरफोड्या व चोऱ्या
जानेवारी ः ४ चोऱ्या
फेब्रुवारी ः ६ चोऱ्या, १ घरफोडी
मार्च ः २ चोऱ्या, १ घरफोडी
एप्रिल ः १ चोरी व १ घरफोडी
मे ः १ चोरी व १ घरफोडी
जून ः १ घरफोडी
.....
चौकट
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून दरवाजे, खिडक्या सुरक्षित बंदिस्त कराव्यात. उच्च प्रतीचे कुलूप लावावे. प्रवासाला बाहेर जाताना घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. प्रवासाची योजना सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नका. घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावयण्याबरोबरच घराभोवती सुरक्षित संरक्षक भिंत बांधा.
- गजेंद्र लोहार, पोलिस निरीक्षक, कागल पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT