कोल्हापूर

उर्दू मराठी शाळेसाठी जागा द्या

CD

6887
कागल : पालिकेसमोर उपोषणास बसलेले मुस्लिम जमियतचे पदाधिकारी व नागरिक.
.....
उर्दू मराठी शाळेसाठी जागा द्या

कागल नगरपालिकेसमोर मुस्लिम जमियतचे लाक्षणिक उपोषण

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १ : येथील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी कागल शहरातील गट कमांक ३८५ मधील १० गुंठे जागेची मागणी नगरपालिकेकडे केली आहे. महसूल विभागाच्या अखत्यारितील या जागेची वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासन देण्यास टाळाटाळ करत आहे. जागेच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुस्लिम जमियतच्या वतीने कागल नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळा भाड्याच्या जागेत आहे. शाळेच्या इमारत आणि क्रीडांगणासाठी जागा देण्याची लेखी मागणी कागल नगरपालिकेकडे केली आहे. शहरातील गट क्रमांक ३८५ मधील १० गुंठे जागा शाळेला देण्यासाठी वर्षभरापूर्वी मुस्लिम जमियतच्या वतीने निवेदनाद्वारे पालिकेकडे मागणी केली आहे. निवेदनावर २६० नागरिकांच्यावर सह्या आहेत. परंतु पालिकेने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मुस्लिम जमियतच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पालिका प्रशासनाने जागेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही पालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे मुस्लिम जमियतच्या संचालकांनी आज कागल नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणात समीर नायकवडी, यासीन आलासकर, दस्तगीर नदाफ, हिदायत नायकवडी, मिरासाब शेख, राजू शाणेदिवाण, बाळासो नाईक, असिफ मुल्ला आदी सहभागी झाले होते.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT