05599, 05600, 05601
बिगस्टोरी
प्रकाश पाटील
कंदलगाव, दऱ्याचे वडगाव, कात्यायणी परिसराला पसंती
‘प्री-वेडिंग’साठी
निसर्गसौंदर्याचे वेड
बदलत्या काळानुसार विवाह सोहळे आणि त्यांच्या तयारीत होत असलेले बदल यामध्ये सध्या लग्नाआधी फिल्मी स्टाईलने ''प्री - वेडिंग'' ही संकल्पना लोकप्रिय होत आहे .या संकल्पनेसाठी कोल्हापूरशेजारील खेडी, ग्रामीण संस्कृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
.........................
कंदलगाव, गिरगाव, पाचगाव, दऱ्याचे वडगाव यासह कात्यायणी, कळंबा परिसरातील डोंगरमाथा, तलाव, हिरवळ, ऐतिहासिक मंदिरे अशी ठिकाणी निवडून परिसरात सध्या प्री-वेडिंग शूटसाठी फोटोग्राफरसह नव्या जोडप्यांचे आवडते डेस्टिनेशन ठरत आहे. अलीकडील पाच - सहा वर्षापासून विवाह सोहळ्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी क्रेझ वाढत आहे. आकर्षण शूटिंग आपणही करावे व लग्नाधीच्या गोड आठवणी जतन कराव्यात, या संकल्पनेने पसंती दिली जाते.
आठवडाभर आधीच स्थळांची पाहणी
इतरांपेक्षा आपले शूट वेगळे होण्यासाठी निसर्गरम्य परिसर, आकर्षक ठिकाणे, ऐतिहासिक स्थळ, धरण, तलाव, डोंगरमाथा आधी ठिकाणे पाहण्यासाठी आठवडाभर आधी सुरुवात होते. या बरोबर थीमप्रमाणे कपडे आणि सौंदर्य साहित्य निवडले जाते.
स्थळांची निवड ..
चित्रीकरण करताना प्रामुख्याने काही मोजक्या स्थळांची निवड यापूर्वी होत होती. मात्र वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी हल्ली शहराशेजारील पर्यटन स्थळांची निवड प्रामुख्याने होत आहे. यासाठी ग्रामीण भागातील मंदिरे, तलाव परिसर तसेच निसर्गरम्य ठिकाणांचा वापर प्रामुख्याने होत आहे.
ही ठिकाणे आकर्षण
कंदलगाव येथील तलाव परिसर, कणेरी मठ रस्ता, डोंगर परिसर, गिरगाव येथील घाट परिसर, मोठ्या टेकड्या, दाट झाडी, कळंबा परिसरातील तलाव, दऱ्याचे वडगाव तलाव, घाट रस्ता, कात्यायनी मंदिर, डोंगरमाथा आधी परिसर चित्रीकरणासाठी आकर्षण ठरत आहे.
पर्यटन वृद्धीस मदत . .
शहराशेजारील दक्षिण परिसर हा निसर्गरम्य स्थळांनी समृद्ध असून या ठिकाणी अनेक पर्यटन ठिकाणी, ऐतिहासिक मंदिरे, फार्म हाऊस, डोंगरदऱ्या असल्याने अशा ठिकाणांची आकर्षण वाढत आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटनाच्या उद्देशाने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
लाईट, कॅमेरा अन् अॅक्शन ..
सध्या प्री - वेडिंगसाठी उच्च दर्जाचे कॅमेरे , आकर्षक लाईट व्यवस्था आणि मनमोहक स्थळांची मागणी असल्याने हा सर्व लवाजमा फोटोग्राफर सोबत ठेवतात. सकाळी तीव्र उन्हाच्या आधी किंवा सायंकाळच्या वेळेत अशा ठिकाणी लाईट, कॅमेरा, अॅक्शन होत असते.
कोट..
प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी आकर्षक आणि जुन्या स्थळांची तसेच माळमाथा परिसर अशी मागणी असते. शहराशेजारील खेड्यामध्ये अशी अनेक ठिकाणे असल्याने अशी स्थळे त्यांच्या पसंतीस उतरत आहेत .
- रोहन पाटील, फोटोग्राफर कंदलगाव,
अभी बेनके, फोटोग्राफर, दऱ्याचे वडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.