कोल्हापूर

कंदलगाव.अनियमित पाणी पुरवठ्याबाबत मतदानावर बहिस्कार टाकणार.. आर.के.नगर वाशीयांचे जीवन प्राधिकरणाला निवेदन..

CD

07693

पाण्यासाठी मतदानावर बहिष्काराचा इशारा
आर. के. नगर वासीयांचे जीवन प्राधिकरणाला निवेदन

कंदलगाव, ता. २५ : मोरेवाडी हद्दीतील आर. के. नगर सोसायटी नं. ३ व ५, करवीर निवासिनी, कोरे नगर, विष्णू नगर, जयप्रकाश नगर या भागामध्ये पाणीपुरवठा करण्याची २००८ पासून जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून एकूण १३ गावांना विभागामार्फत पाणीपुरवठा होतो. या पुरवठ्यात अनियमितता असल्याने नागरिकांनी शाखा अभियंता ऋतुजा जाधव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा, ‘पाणी पुरवठा बेजबाबदारपणे केला जातो. यावर कमीत कमी ४ ते ५ वेळेला अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली आहे. मात्र, कोणतीही सुधारणा झालेली नाही.
राजकीय, सामाजिक तसेच जिल्हाधिकारी यांनीही विचारणा केली आहे. तरीही आपल्याकडून कामात सुधारणा नाही. महिन्यातील तीस दिवसांपैकी जेमतेम आठ ते नऊ दिवस पाणीपुरवठा करणे तोही अपुरा व अनियमित तसेच कोणत्याही वेळेस पाणीपुरवठा करणे, यामुळे नागरिक वैतागले आहेत. मागण्या अशा ः पाणीपुरवठा अपुरा असताना मीटर रीडिंग का, पाणी येणाऱ्या दिवशीचेच बिल घ्यावे, यासह आर. के. नगरच्या भागामध्ये नियमित बिले भरली जातात. त्या भागात पाणीपुरवठा योग्य व्हावा, थकबाकीदारांवर कारवाई व्हावी, याबाबत सकारात्मक कार्यवाही अपेक्षित आहे.’
यावेळी शुभदा लाड, राजेंद्र रानगे, प्रवीण पाटील, अनिल साळोखे, डॉ. लक्ष्मीकांत नलावडे, शिरीष कुलकर्णी, राजेंद्र सूर्यवंशी, नसीम मुल्ला, लता शिंदे, ज्योत्स्ना कुलकर्णी, विजय भोसले, विनायक भोसले, शशिकांत शिंदे, उमा भोसले, पिंटू जरग यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चौकट.
असा मार्ग निघू शकतो.
परिसरात महापालिका व जीवन प्राधिकरण अशा दोन विभागांच्या जलवाहिन्या आहेत. दोन महिन्यांतील पाणीपुरवठ्याचा रेकॉर्ड सादर करत तूर्तास महापालिका जलवाहिनीमधून भागास पाणीपुरवठा जोडला जावा. जेणेकरून गंभीर प्रश्नावर मार्ग निघेल. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT