कोल्हापूर

कंदलगाव मुख्य रस्त्यावरील खोदाई काम संपता संपेना...

CD

07705
कदलगाव : आर. के. नगर ते कंदलगाव रस्त्यावर सुरू असलेली खोदाई.

कंदलगाव मुख्य रस्त्यावरील
खोदाई काम संपता संपेना...
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २९ : आर. के. नगर ते कंदलगाव मुख्य रस्त्यावर या योजनेंतर्गत खोदाईचे काम अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कामाला म्हणावी तशी गती नसल्याने आपल्या वेळेनुसार काम सुरू आहे. त्यामुळे महिन्याभरापासून या ठिकाण सुरू असलेले काम संपता संपेना अशी स्थिती झाली आहे. याचा वाहतुकीला फटका बसत आहे.
गांधीनगर प्रादेशिक योजनेतून शहरालगत असणाऱ्या उचगाव, उजळाईवाडी, मोरेवाडी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, वाढीव आराखड्यात पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव यासह १४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी या गावांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे.
या रस्त्यावरील वाहतूकीची वर्दळ पाहता तसेच कामाची गती पाहता खोदाईमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या खोदाईमधील मोठे दगड रस्त्यावर टाकल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे.
--------------
चौकट
मोठ्या मशिनलाही दगड फुटेना
हा परिसर माळरानाचा असल्याने या ठिकाणी खोदाईमध्ये कठीण दगड लागला आहे. हा दगड फोडण्यासाठी योग्य मशिनरी नसल्याने मिळेल त्या मशिनरी वापरून काम सुरू असल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र जुन्या मशिनरींना दगड फुटत नसल्याने कामात दिरंगाई येत आहे. या रस्त्यावर दगड पडल्याने अपघाताची शक्यता आहे.
-------------खोदाईकडे दुर्लक्ष
मुख्य रस्ता, वाहतूकीची वर्दळ, भरधाव वाहतूक यामुळे घडणारे अपघात याचा विचार करता या रस्त्यावरील खोदाई काम त्वरीत पूर्ण करणे गरजेचे होते, मात्र महिन्याभरात तीन आठवडे दगड रस्त्यावर टाकून काम बंद होते. याकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT