कोल्हापूर

कोल्हापूर .''पन्नासची भिशी पर्यावरणासाठी'' रयत फाउंडेशनकडूनचा उपक्रम..

CD

07933
कोल्हापूर : जुना वाशी नाका येथे रयत फाउंडेशनच्या सदस्यांनी प्लास्टिक संकलित केले.


पर्यावरणासाठी ‘पन्नासची भिशी’
‘रयत फाउंडेशन’चा पुढाकार; प्लास्टिकमुक्तीसह वृक्षारोपणाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : कोल्हापूर जिल्हा पर्यावरणाने समृद्ध आहे. मात्र, शहरासह खेड्यांत प्लास्टिक व कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले आहे. हे चित्र बदलण्यासाठी रयत फाउंडेशनतर्फे ‘पन्नासची भिशी पर्यावरणासाठी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनने हा प्लास्टिक मुक्त आणि वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे.
यंदा या उपक्रमाची सुरुवात जुना वाशीनाका राज कपूर पुतळा परिसरात घरांतील प्लास्टिक संकलित करून केला. हा उपक्रम प्रत्येक महिन्यात घेतला जाणार असून ही सुरुवात स्वतःपासूनच करीत रयत फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी प्लास्टिकचे संकलन केले. तसेच झाडांच्या बिया, रोपे यांची देवाणघेवाण केली. पर्यावरण आणि झाडांचे महत्त्व सांगून प्रबोधन, कंपोस्ट खत याविषयी मार्गदर्शन केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी धनश्री जाधव, प्रफुल्लता बिडकर, नेहा मोरे, कविता कोळेकर, माधुरी हळबे, संचिता गुळवणी, दीपाली खराडे, दीपाली मोरे, रमा गायकवाड, सविता चव्हाण, शीतल लोखंडे, कल्पना वाईंगडे, सविता साळोखे यांचे सहकार्य लाभले.
----------------
चौकट
अशी आहे ‘पन्नासची भिशी’
कचरा, प्रदूषण व वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याला पर्याय म्हणून केवळ जनजागृती उपयोगी पडत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. यासाठी ‘पन्नासच्या भिशी’तून प्रत्येक सदस्याकडून पन्नास रुपये वर्गणी काढण्यात येणार असून प्रत्येक सदस्याच्या वाढदिनी वृक्षारोपण व प्लास्टिक संकलन करण्यात येणार आहे.
----------------
07932
कोट
गेल्या दहा वर्षांत झाडांची संख्या कमी झाली आहे. ती वृक्षारोपणातून वाढवू, तसेच प्लास्टिकमुक्त चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून शहर स्वच्छतेला हातभार लावू.
- उज्ज्वला पटेल, संस्थापक अध्यक्षा, रयत फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT