कोल्हापूर

कंदलगाव .आयएमईआरच्या विद्यार्थ्यांनी केलेले सर्वेक्षण गरजेचे आहे..एपीआय सत्यजीत घुले:

CD

07974

‘आयएमईआर’ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण उपयुक्त
एपीआय सत्यजीत घुले; रस्ते सुरक्षेबाबत संशोधन प्रकल्प

कंदलगाव, ता. ११ : ‘आयएमईआर’मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षेबाबत केलेले सर्वेक्षण अतिशय गरजेचे आणि उपयुक्त आहे. या सर्वेक्षणातून मिळालेले निष्कर्ष भविष्यातील संशोधन आणि धोरणांसाठी उपयुक्त आहेत; असे प्रतिपादन महामार्ग पोलिसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत घुले यांनी केले.
‘केआयटी’च्या ‘आयएमईआर’मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षेबाबत दुचाकीधारकांच्या जागरुकतेबाबत केलेला संशोधन प्रकल्प स्वीकारताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ.एस.एम खाडिलकर होते. पुणे-बंगळूर महामार्गावरील दुचाकीधारकांची रस्ते सुरक्षेबाबत असणारी जागरुकतेविषयी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी संशोधन आणि सर्वेक्षण केले. याबाबतचा हा प्रकल्प अहवाल महामार्ग पोलिस विभागाला सादर करण्यात आला. यावेळी सत्यजीत घुले यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर क्राईम, निर्भया पथक याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी कौतुक केले. यावेळी संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. प्रवीण जाधव, एमबीए विभागप्रमुख डॉ. आर. पी. शिंदे उपस्थित होते. संशोधनासाठी ‘केआयटी’चे चेअरमन सुनील कुलकर्णी, व्हाईस चेअरमन साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, ट्रस्टी डायरेक्टर सचिन मेनन यांचे प्रोत्साहन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT