कोल्हापूर

पाण्यासाठी नंगिवली चौक येथे रस्ता रोको

CD

88286
कळंबा : वारे वसाहत येथे पाण्यासाठी महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. (छायाचित्र : संजय दाभाडे)

वारे वसाहतीत पाण्यासाठी
महिलांकडून ‘रास्ता रोको’
चार दिवस टंचाई; महापालिकेचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. ५ : गेले चार दिवस नळाला पाणी आलेले नाही. महापालिकेने टँकरही पाठवले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नंगिवली चौक व वारे वसाहत येथील नागरिकांनी ‘रास्ता रोको’ करून पालिका प्रशासनाचा निषेध केला. अचानक केलेल्या आंदोलनामुळे मंगळवार पेठ व संभाजी नगर मार्गे येणारी वाहतूक विस्कळित झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. एक तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू होते. पालिकेने टँकर पाठवून दिल्यानंतर नागरिकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले.
चार दिवस नळाला पाणी आले नसल्यामुळे येथील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. पालिका प्रशासनाने येथील पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. परिसरामध्ये पाण्यासाठी कूपनलिकेची पुरेशी व्यवस्था व अन्य पर्याय नसल्यामुळे येथील नागरिकांनी विकतचा टँकर घेतला होता. त्याचे दर जास्त असल्यामुळे अनेक नागरिकांनी महापालिकेचे टँकर मागवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अनेक वॉर्डात पालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. टँकरची व्यवस्था झाल्यानंतर नंगिवली चौक व वारे वसाहत या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यावेळी विशाल सकट, रवी भाले, संगीता भाले, दादू कांबळे, प्रमोद भाले, अभिजित शहा, विशाल भाले, लक्ष्मी भाले, सुनीता भाले, सुनीता संपकाळ, शिल्पा गायकवाड, भारती गणेश आचार्य, नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT