कोल्हापूर

कोल्हापुरी बंधारे ओव्हर फ्लो

CD

02163
कळंबाः परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओसंडून वाहत आहेत. (छायाचित्र ः दीपक तिवले)

...
कोल्हापूर पद्धतीचे
बंधारे ओव्हर फ्लो
कळंबा - कात्यायनी परिसरातील चित्र

कळंबा, ता. ७ः मुसळधार पावसाने कळंबा - कात्यायनी परिसरातील ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतीला फायदा होणार असून कळंबा तलाव, कूपनलिका, विहिरी यांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे. दरम्यान, बंधारे भरल्यामुळे व पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच कळंबा तलावाला मिळणारे अनेक ओढे, नाले पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहेत.
कळंबा परिसरामध्ये पाच हजार हेक्टरहून अधिक बागायती शेतीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये बारमाही विविध जातीची पिके घेतली जातात. कळंबा तलाव, दोनशेहून अधिक कूपनलिका, शंभर विहिरी व अकरा कोल्हापुरी बंधारे अशा अनेक पाणीसाठ्याची देण या शेतीला मिळाली आहे. मात्र, बेसुमार पाणी उपशामुळे गेले तीन महिने कळंबा तलाव कोरडा पडला होता. तसेच येथील विहिरी, कूपनलिका व शेती बंधारे यांच्यातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. पाणीपुरवठ्याअभावी ऊसशेतीसह अनेक शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पन्नात घट होणार चित्र आहे. गेले महिनाभर अनियमित पाऊस पडत होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक ओढे -नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. कळंबा तलावात या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे तलाव भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, पुढील काळामध्ये दमदार पर्जन्यवृष्टी होण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT