कोल्हापूर

तनिष्क माध्यमातून महिलांच्या आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा पुरवणार -जयदीप पाटील

CD

02694

महिलांना आरोग्य, शिक्षणाच्या
सुविधा पुरविणार : जयदीप पाटील

केखलेत तनिष्क, निर्माण संस्थेतर्फे आरोग्य शिबिर

कोडोली, ता. १० : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्क गटाच्या माध्यमातून महिलांना आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा पुरवणार असल्याचे मत जयदीप पाटील यांनी व्यक्त केले. केखले तनिष्क गट व निर्माण सामाजिक संस्था, कोडोली यांच्या संयुक्त विद्यमाने केखलेत महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते.
केखले येथील हनुमान देवालयात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील होते. यावेळी शंभरहून अधिक महिलांची मोफत रक्त व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पूजा खोत, कांचन पाटील, ग्रामसंघ अध्यक्ष गीता पाटील, अश्विनी पाटील, रोहिणी गुरव, श्रेयस गुरव अश्विनी पाटील, कविता सरनोबत, शुभांगी पाटील,अश्विनी निकम, भाग्यश्री कासार, वंदना पाटील, अंकिता पाटील, मिनाज मुजावर, सुजाता पाटील, भारती पाटील, मेघा पाटील, सुरेखा मगदूम, तेजस्विनी पाटील, अनुष्का पाटील यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. केखले तनिष्का गटप्रमुख तनिष्का पाटील प्रास्ताविक, स्वागत केले. धनश्री पाटील यांनी सूत्रसंचालन तर आभार सुनीता पाटील यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT