कोल्हापूर

गोकुळच्या वतीने भुदरगड तालुक्यात प्रत्येक गावात वंध्यत्व निवारण कार्यक्रम : नंदकुमार ढेंगे.

CD

04602

वांझ जनावरांमुळे
उत्पादनखर्च वाढता

नंदकुमार ढेंगे; महालवाडीत गोकुळचा वंध्यत्व निवारण कार्यक्रम

कोनवडे, ता. १० : गोठ्यातील वांझ जनावरांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च वाढत आहे. ही जनावरे दुधावर येण्यासाठी गोकुळने वंध्यत्व निवारणासाठी दोन महिन्यांचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोकुळचे संचालक तथा भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार ढेंगे यांनी केले.
ते ''गोकुळ''च्या वतीने महालवाडी (ता. भुदरगड) येथे भुदरगड तालुक्यातील वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचा प्रारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी नवनाथ कोराणे होते.
प्रारंभी स्वागत सहाय्यक दूध संकलन अधिकारी अजित जगताप यांनी केले. गोकुळचे वरिष्ठ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. के .चव्हाण यांनी दोन महिन्यांत भुदरगड तालुक्यातील प्रत्येक गावात वांझ जनावरे दुधावर आणण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचे आयोजन करून जनावरांची तपासणी आणि औषध उपचार केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी संचालक नंदकुमार ढेंगे यांच्या हस्ते वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महालवाडीतील सर्व वांझ जनावरांची डॉ. पी. के. चव्हाण, कृत्रिम रेतन सेवक बाजीराव चौगले यांनी तपासणी करून औषधोपचार केले.
यावेळी सरपंच दयानंद आरेकर, दिलीप निकाडे, विठ्ठल इंदुलकर, वनश्री कोराणे, भैरनाथ घावरे आदींसह दूध उत्पादक, शेतकरी उपस्थित होते. गोकुळचे विस्तार अधिकारी विक्रम पाटील सोनाळीकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT