कोल्हापूर

राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यांतील २९ गावांना फायदा डोंगरमाथ्यावरील शेकडो एकर क्षेत्राला लाभ

CD

‘बसुदेव-भुजाई’च्या आशा पल्लवित

एक कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर ः शेकडो एकर क्षेत्र येणार सिंचनाखाली

अरविंद सुतार ः सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ७ : बसुदेव-भुजाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी एक कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेमुळे भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरा आणि राधानगरी, कागल तालुक्यांतील काही गावांच्या डोंगरमाथ्यावरील शेकडो एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजना तब्बल २७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वित होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
योजनेच्या मंजुरीसाठी १९९८ ला शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून कासारपुतळे व धामणवाडी गावांच्या हद्दीतून योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. योजना तीन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन आहे. कालव्यावरून पहिल्या टप्प्यात ७२ मीटर उंचीवर व २७० मीटर लांबीवर पाणी उपसा करून तेथून पुढे ७२० मीटर पाटाने पाणी आणण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात १०५ मीटर उंचीवर व ४२० मीटर लांबीवर पाणी उपसा करून ६२० मीटर पाटाने पाणी नेण्याचे नियोजित आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ मीटर उंचीवर व ३२० मीटर लांबीवर पाणी उपसा करण्याचे धोरण आखले आहे. एकूण २३५० मीटर अंतरात १३४० मीटर लांबीने पाटाने पाणी फिरविण्यात येणार आहे.
भुदरगड तालुक्यातील १९ गावांचे लागवडीखालील एकूण क्षेत्र ५५३८ हेक्टर असून, त्यापैकी कूर उपकालव्याखाली १४७० हेक्टर पाटाने भिजणारे क्षेत्र व १५ मीटर उंचीपर्यंत उपसा सिंचन करून ६२४ हेक्टर क्षेत्र सध्या ओलिताखाली आहे. मात्र, लाभ क्षेत्रात पठारी प्रदेश असल्याने ३४४४ हेक्टर क्षेत्र अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. सद्यःस्थितीत कालव्यातील एकूण क्षेत्र १९८७ हेक्टर व १५ मीटर उंचीवरील ६२३ हेक्टर असे एकूण २६१० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याची तरतूद आहे. भुदरगडमधील १९ गावांतील १३ हजार एकराला पाणी पुरवठा होणार आहे.
......
चौकट...
लोकप्रतिनिधींमुळे २७ वर्षे प्रस्ताव रखडला
१९९८ मध्ये टिक्केवाडी येथे आर. व्ही. देसाई यांनी पाणी परिषद, तर कोनवडे येथे १९९९ ला तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री अजित घोरपडे यांनी ही उपसा सिंचन योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा केली होती. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे २७ वर्षे प्रस्ताव रखडला होता. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नामुळे या योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
....
चौकट...
योजनेचा लाभ होणारी गावे
भुदरगड ः मुदाळ, कूर, कोनवडे, नाधवडे, खापरेवाडी, टिक्केवाडी, निळपण, दारवाड, बसरेवाडी, पाचवडे, मिणचे खुर्द, मिणचे बुद्रुक, बसरेवाडी, लोटेवाडी, पंडिवरे, कोळवण, पाळेवाडी, हेदवडे, गिरगाव, नवरसवाडी.
राधानगरी ः सरवडे, कासारवाडा, कासारपुतळे, सावर्डे पाटणकर, धामणवाडी, ढेंगेवाडी, पंडेवाडी.
कागल ः बोरवडे, उंदरवाडी
.................
दृष्टिक्षेपात
कासारपुतळे, धामणवाडी हद्दीतून योजनेचा प्रस्ताव
योजना तीन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन
१३४० मीटर लांबीने पाटाने पाणी फिरणार
राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यांतील २९ गावांना फायदा
डोंगरमाथ्यावरील शेकडो एकर क्षेत्राला लाभ
...
कोट...
जागा सोडणे....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT