कोल्हापूर

बिग स्टोरी

CD

बिग स्टोरी
संदीप खांडेकर...

कृषीपंप ग्राहकांच्या पोटात गोळा; मीटर नादुरुस्त, तरीही बिल

प्रस्तावित वीज
दरवाढीचा ‘झटका’

सात वर्षांपूर्वी कृषी पंप ग्राहकांच्या बिलात ७२ पैसे वाढ झाली. पुन्हा २०२२-२३ ला १ रुपये ९५ पैसे दरवाढ झाल्याने ग्राहक अस्वस्थ झाला. आता २०२५ ला हा आकडा ३ रुपये १० पैसे होणार आहे. ग्राहकांना २०१९ व २०२१ च्या महापुराचा झटका बसल्यानंतर वीज बिल भरणे मुश्‍किल झाले असून, त्यांच्या मीटर दुरुस्तीचा प्रश्‍न सुटलेला नाही. तरीही बिले येत असल्याने त्यांच्यात संतापाचा सूर आहे. प्रस्तावित दरवाढीने त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.
.............

गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर ग्रामीण एक, कोल्हापूर ग्रामीण दोन, कोल्हापूर शहरमधील एकूण ग्राहकांची संख्या १ लाख ४६ हजार, तर जिल्ह्यातील आकडा १२ लाखांवर आहे. त्यांच्याकडील एकूण थकबाकीचा आकडा ४४६ कोटी ८८ लाख इतका आहे. जिल्ह्यातील ७.५ अश्‍वशक्तीपेक्षा अधिक वीजभार असलेल्या २ हजार १४३ ग्राहकांनी पाच वर्षांत एकही वीज बिल भरले नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
महापुराचा झटका बसल्याने कृषी पंपांचे वीज मीटर नादुरुस्त झाली आहेत. त्यांची दुरुस्ती झालेली नसताना ग्राहकांना बिले येत आहेत. महावितरणतर्फे मीटर दुरुस्ती केली नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मीटरची बाजारातील किंमत ३५०० ते ३८०० रुपये असून, ती ग्राहकाला खरेदी करावे लागत आहे. त्याची तपासणी महावितरण यंत्रणेकडून झाल्यानंतर ते बसवावे लागत असून, त्याला १५०० रुपये इतका रिफंड मिळत आहे. मीटरची चोरी झाली असेल तर ग्राहक मीटर बसवायला तयार आहे. महावितरणकडून मिळणाऱ्या मीटरची किंमत साधारणपणे १५०० रुपयांपर्यंत असून, मीटर शॉर्टेज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. या स्थितीत दिवसेंदिवस बिलाचा वाढणारा आकडा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. त्यात प्रस्तावित दरवाढ त्यांना झटका देणारी ठरणार आहे. कृषी पंप ग्राहकांनी बिले भरण्यासाठी महावितरणने सवलत दिली आहे. प्रस्तावित दरवाढीचा आकडा पाहता सवलतीच्या आकड्यात वाढ होईल का, असा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे.
--------------
कोट -
महावितरणचा कारभार अंधारातला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून ते घेत नाहीत. बिल भराच, असा तगादा लावतात. कृषी पंपांचे मीटर नादुरुस्त असून, ती बदलायला त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याला वेळीच आवर घालणे जरूरीचे आहे.
- विक्रांत पाटील-किणीकर (इरिगेशन फेडरेशन)
-----------------
कोट -
महावितरण व शासनाची भूमिका कृषी पंप ग्राहकांच्या विरोधातील आहे. त्यातून ग्राहकांच्या बिलाचा आकडा चांगलाच फुगणार आहे. सध्याची दरवाढ ग्राहकाला परवडणारी नाही. त्यात प्रस्तावित दरवाढ चिंतेची बाब आहे. याविरोधात ग्राहकांनी आवाज उठवून मोर्चा काढायला हवा.
- प्रताप होगाडे (महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना)
----------------
कोट -
महावितरणचे कर्मचारी मीटर रीडिंग घ्यायला येत नाहीत. स्वत:हून ते द्यावे लागते. महापुरात कृषी पंपांचे काय नुकसान झाले, याची माहिती महावितरणने घेतली होती. पुढे काहीच झाले नाही. दरवाढ परवडत नसली तरी बिल भरावे लागते. आधीच पिकाला पोषक वातावरण नसल्याने उत्पन्नावर मर्यादा आहे.
- वसंत गायकवाड (कृषीपंप ग्राहक)
............
दृष्टिक्षेपात...
जिल्ह्यातील ग्राहक १२ लाख
एकूण थकबाकी ४४६ कोटी ८८ लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT