कोल्हापूर

रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा

CD

00884
धामोड : येथील तुळशी तलावात ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. (छायाचित्र : केरबा जाधव)


तुळशी तलावात ७८ टक्के पाणीसाठा

धामोड : राधानगरी तालुक्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या येथील तुळशी तलावात ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राधानगरी व करवीर तालुक्यातील २८ गावांना लाभदायी ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या पाणीसाठ्याचे येथील प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यामुळे यावर्षी पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पंधरा दिवस अगोदरच गतवर्षीच्या तुलनेत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. सध्या या प्रकल्पाची पाणी पातळी ६१३.०८ मीटर इतकी आहे, तर जलाशयाचा २८०३.२७९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पातून शंभर क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तुळशी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या प्रकल्पातील शिल्लक पाण्याचे पूर्णपणे नियोजन केले असून शेती व पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.
.....

‘आंदोलन अंकुश’ उभारणार शेतकरी वजनकाटा
शिरोळ ः ‘साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वजनामध्ये लूट सुरू आहे. ती थांबवण्याकरीता ‘आंदोलन अंकुश’ च्या वतीने शेतकरी वजनकाटा उभारण्यात येत आहे. याकामी सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.
संघटनेच्या वतीने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देणगीतून शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावर शेतकरी वजनकाटा उभारण्याचे भूमिपूजन व देणगी जमा करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी चुडमुंगे म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजनकाटा असावा, अशी या भागातील शेतकऱ्यांच्या मनात भावना होती. त्या मागणीतूनच शेतकरी वजनकाटा उभारण्याचा ‘आंदोलन अंकुश’ ने संकल्प केला होता. शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावरील रामचंद्र गेंडे पुजारी यांच्या जागेत काटा उभारणी होत आहे. येत्या ऊस हंगामापर्यंत आम्ही हा वजनकाटा उभारावा म्हणून प्रयत्न करणार आहोत. भागातील शेतकऱ्यांनी या काट्यासाठी देणगी देण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे.’ यावेळी चंद्रकांत जोंग, भोला कागले, डॉ. सी. डी. पाटील, सुरेश शहापुरे, सत्येंद्र खुरपे उपस्थित होते. दरम्यान, काटा उभारण्यासाठी देणगी गोळा करण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमावेळीच उपस्थित शेतकऱ्यांकडून जवळपास एक लाख २५ हजार रुपये देणगी रोखीने व चेक स्वरूपात जमा केली गेली.
...

पारगड-मिरवेल रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा

चंदगड ः पारगड ते मिरवेल या रस्त्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मिरवेल ग्रामस्थांनी २० तारखेपासून येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. या रस्त्यावर २००८ साली डांबर पडले होते. त्यानंतर अद्याप त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाने रस्त्याची दुर्दशा झाली असून चालणेसुद्धा अवघड झाले आहे. यासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी या रस्त्यासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर केला; परंतु अद्याप तो बांधकाम विभागाकडे वर्ग झाला नसल्याचे या खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याप्रश्नी दिलेल्या निवेदनावर बुधाजी पवार, विद्याधर बाणे, मनोहर पवार, रामा पवार, संतोष पवार, रमाकांत पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT