कोल्हापूर

जीपीएस पुन्हा बसवणार

CD

महापालिका वाहनांना
पुन्हा लावणार जीपीएस

कोल्हापूर, ता. ८ ः अनेकदा गरज असताना जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर अगदी धूर मशीन वेळेवर मिळत नाही. ती नेमकी कोठे आहेत याचा शोध आता लागणार आहे. महापालिकेच्या वर्कशॉप विभागाने १७० वाहनांवर लवकरच जीपीएस यंत्रणा बसवण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रस्ताव केला जात आहे.
महापालिकेच्या वाहनांचा योग्य वापर व्हावा, चुकीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी २०१७ मध्ये जीपीएस यंत्रणा लावली होती. त्यासाठीचे सॉफ्टवेअर व यंत्रणा पुढील तीन वर्षे चालवण्याची निविदा दिली होती. ही यंत्रणा बसवून प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रीत केले होते. अगदी कचरा उठवणाऱ्या कॉम्पॅक्टरवरही ती लावली असल्याने वेळेत कचरा उठवण्यासाठी वेळापत्रक तयार केले होते. दोन वर्षे त्याचे नुतनीकरण संबंधित कंपनीने करून दिले. त्यानंतर कोरोना काळ सुरू झाला व कंपनीचा ठेकाही संपला. ती कंपनीच बंद झाल्याने त्यांनी वाहनांवर बसवलेली यंत्रणा सुरू करता आली नाही. तसेच ती दुसऱ्या यंत्रणेकडून सुरू करण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला.
त्यामुळे नवीन यंत्रणा घेण्याचे वर्कशॉपने ठरवले असून त्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. महापालिकेच्या वर्कशॉपकडे असणारी १५५ वाहने तसेच आरोग्य विभागाकडे असणारी १५ धूर मशिन यांना जीपीएस बसवण्यात येणार आहे.

चौकट
सध्या माहितीचा अभाव
वर्कशॉपमधून बाहेर पडणारे वाहन दिलेले काम करून इतर कुठे गेले यासाठी चालकाच्या माहितीवर अवलंबून रहावे लागते. नेमून दिलेल्या कामासाठी खरोखरच इतका वेळ लागला की वेळ घालवला गेला याची माहिती मिळत नाही. जीपीएसमुळे हे प्रकार थांबून शिस्त लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT