कोल्हापूर

वाचक पत्रे

CD

वाचक पत्रे

शासकीय निवासस्‍थानाची दुरवस्‍था

कारदगा या ठिकाणी शासकीय दवाखाना आहे. त्‍या ठिकाणी डॉक्‍टर व इतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्‍थाने बांधली आहेत. त्‍या निवासस्‍थानामध्ये काही काळ कर्मचारी राहिले. पण नंतर कर्मचाऱ्यांनी निवासस्‍थाने सोडली. सध्या त्‍या निवासस्‍थानाच्‍या भिंती पडल्‍या असून दारे व खिडक्‍या मोडल्‍या आहेत. काही निवासस्‍थानावर ---- --- आहेत. वेळीच याची दुरूस्‍ती न केल्‍यास ती जमिनदोस्‍त होण्याची भिती आहे. तरी वेळीच याची दखल घेवून त्‍याची दुरूस्‍ती करावी व कर्मचाऱ्यांना निवासस्‍थाने उपलब्‍ध करून द्यावीत.
- रामभाऊ कुलकर्णी, कोल्‍हापूर.

-------------------------
वाहतुकीचा बोजवारा/ ध्वनीप्रदुषण
नागाळा पार्क, विवेकानंद कॉलेज, महाराष्ट्र मार्केट, महाराष्ट्र गार्डन ते स्‍टेट बँक गणेश को.ऑप. हौसिंग सोसायटी मार्गे आदित्‍य कॉर्नरवरून प्रचंड रहदारीच्‍या अरूंद रस्‍त्‍यावरून दिवसरात्र असंख्य प्रकारची उदा. रिक्षा, स्‍कूलबस, चारचाकी मोटर्स, टेंपो, ट्रक्‍ससुद्धा, दुचाकी स्‍कूटर्स, मोटरसाईकल, अशी शेकडो- हजारो वाहने, त्‍यांचे कर्कश हॉर्नस्‌, ध्वनीप्रदूषण करत आहेत. परिसरातील नागरिक, कॉलेजची मुले-मुली, पादचारी वाहनांच्‍या गर्दीतून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करताना दिसतात. कॉलेजची तरूण मुले-मुली दुचाकी, स्‍कूटर्स, मोटरसायकल्‍स अती वेगाने, मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवत ध्वनीप्रदुषणात भर घालत आहेत. एका गाडीवर 3-3, 4-4 जण मार्गक्रमण करीत असतात. रस्‍ते काटकोनात वळणारे असल्‍यामुळे, पुढचे न दिसल्‍यामुळे रोज किरकोळ अपघात होत असतात. या रस्‍त्‍यावर एका बाजूला कित्‍येक चारचाकी गाड्या अहोरात्र पार्क केलेल्‍या असतात. त्‍यामुळे ट्रॅफिक जाम होण्याचे प्रसंग पुष्कळवेळा येतात. (पोलिस, आरटीओ, यांना हे नजरेला येत नाही का?) वाहतुकीचा बोजवारा व ध्वनीप्रदूषणाने परिसरातील नागरीक त्रस्‍त झाले आहेत. ज्‍येष्ठ नागरिक कर्णबधीर होत आहेत.
मनपाच्‍या प्रशासक श्री. बलकवडे मॅडम, तसेच पोलिस अधिक्षक श्री बलकवडेसाहेब यांना विनंती आहे की त्‍यांनी, वरनिर्देशीत परिस्‍थिती स्‍वतः नजरेखाली घालावी व योग्‍य ती कारवाई करावी.
या संदर्भात काही सूचना कराव्या वाटतात त्‍या अशा-
१. या परिसरातल्‍या रस्‍त्‍यावर थोड्या-थोड्या अंतरावर योग्‍य प्रमाणात स्‍पीडब्रेकर्स घालावेत, जेणेकरून वाहनांच्‍या वेगावर मर्यादा येईल.
२. हा संपूर्ण रस्‍ता एकमार्गी करावा.
३. परिसर सायलेंट झोन करावा.
४. खड्डेमय रस्‍त्‍याची डागडुजी करावी
५. कॉलेज भरण्याच्‍या, सुटण्याच्‍या वेळात या रस्‍त्‍यावर ट्रॅफिक पोलिसांची बंदोबस्‍त असावी.
- प्रभाकर कानिटकर, ज्‍येष्ठ नागरिक, नागाळा पार्क, कोल्‍हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT