कोल्हापूर

आवश्‍यक बातमी

CD

शेडप्रकरणी विशाळगड संवर्धन
समितीची कारवाईची मागणी

कोल्हापूर, ता. ८ : किल्ले विशाळगड येथे कोंबडे कापण्यासाठी शेड उभा करण्यात येत आहे. कायद्याला आणि राज्य पुरातत्त्व खात्याला संबंधित जुमानत नसल्याचे दिसून येते. हे शेड उभा करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करावा. जर कारवाई करण्यास टाळाटाळ केली, तर आपल्याविरुद्ध प्राचीन स्मारक व पुरातत्व स्थळे व अवशेष (संशोधन) अधिनियम २०१० नुसार गुन्हा नोंद करावा लागेल, अशा आशयाचे निवेदन विशाळगड संवर्धन समितीने सहाय्यक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांना दिले आहे.
ीनिवेदनातील माहितीनुसार, शिवदुर्ग संवर्धन आंदोलनामार्फत २० जानेवारी रोजी विशाळगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात कोंबडे कापण्यासाठी अनधिकृत पत्रा शेड उभारले जात असल्याबद्दल निवेदनाद्वारे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मुराद महंमद मुजावर यांच्यावर २४ जानेवारी रोजी पत्राद्वारे शाहूवाडी तहसीलदार यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती केली होती. आम्ही ज्यावेळी तक्रार केली, त्यावेळी या शेडचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते; पण आपण कारवाई करण्यास विनंती केल्यानंतर कारवाई तर झालीच नाही. संबंधित व्यक्तीने हे बांधकाम पूर्ण केले असून या ठिकाणी पत्रा शेड, जमिनीवर सिमेंट, खडी, वाळूमिश्रित कोबा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT