कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

अधिकाधिक गुन्ह्यांची उकल करा
पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर, ता. ८ ः आगामी काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करून अधिक गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. सुमारे पाच तासांहून अधिक काळ ही बैठक चालली.
पोलिस अधीक्षक बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. १९ व २० फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. तसेच कणेरी मठावरील कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक मंत्री आणि व्हीआयपींचे दौरे आहेत. यामध्ये बंदोबस्त आणि त्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्यावर मोकासह अन्य कलमांद्वारे कारवाई करता येत असल्यास त्याचे प्रस्ताव पाठवा, गुन्हेगारी कमी करतानाच गुन्ह्यांची उकलही झाली पाहिजे, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहरासह परिसरातील पोलिस चौक्या कायम खुल्या असल्या पाहिजेत. स्थानिक नागरिकांना तेथेच सुविधा मिळाल्या पाहिजेत, याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यासाठी अधिक पोलिस कर्मचारी आवश्‍यक आहेत, तेही देण्याची व्यवस्था पोलिस अधीक्षकांकडून करण्यात येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
----------------

खूनप्रकरणी संशयित पतीस कोठडी
कोल्हापूर, ता. ८ः बालिंगा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या संशयितास आज न्यायालयात हजर केले असता त्याला दहा फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नितीन दगडू अहिवळे (वय ३५, मूळ, रा. खडकी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. नितीनने पत्नीच्या खुनाची कबुली करवीर पोलिस ठाण्यात येऊन दिली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच तिचा खून केल्याचे त्याने पोलिसांकडे सांगितले. नितीनने गुन्ह्यात वापरलेला दगड, रक्ताने माखलेले कपडे जप्त केल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविंद काळे यांनी आज दिली.
---------

विषारी द्रव्य प्यायल्याने मृत्यू

कोल्हापूर ः विषारी द्रव्य प्यायल्याने उपचार सुरू असलेल्या सुनील मारुती होडगे (वय ४८, रा. माद्याळ, कागल) यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्‍यांनी राहत्या घरी विषारी द्रव्य प्‍यायल्‍याने त्यांना सीपीआरमध्‍ये दाखल केले होते. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
------------
अपघातात दोघे जखमी
कोल्‍हापूर : सांगवडे फाटा (ता. करवीर) येथील अपघातात दोघे जखमी झाले. विकी विष्‍णू सासने (वय ३२) व अनिल दगडू आदमाने (३२, दोघे रा. यड्राव, ता. शिरोळ) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्‍या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-------------

ए. एस. ट्रेडर्सचे आणखी एक कार्यालय बंद
कोल्हापूर ः गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे कोल्हापुरातील आणखी एक कार्यालय आज बंद झाले. कंपनीचे संचालक ऑनलाईन बैठका घेत असतानाच आज पितळी गणपती मंदिर परिसरातील कार्यालय बंद करण्यात आले. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या दहा संचालकांना अजूनही दिलासा मिळालेला नसल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. आज याबाबत न्यायालयात युक्तिवाद झाला असून त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT