कोल्हापूर

लॅडरसाठी टॅंकर

CD

21435
कोल्हापूर : महापालिकेच्या ताफ्यातील टर्न टेबल लॅडर.

लॅडरसाठीच्या पाण्याची होणार सोय
१२ हजार लिटरच्या टॅंकरसाठी ५५ लाख मिळाले; महापालिकाही देणार निधी
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : राज्य सरकारच्या मदतीने टर्न टेबल लॅडर महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने अकरा मजली इमारतीतून रेस्क्यू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पण त्या उंचीवर पाणी मारण्यासाठी लागणाऱ्या ताकदीच्या टॅंकरअभावी होणारी अडचण सुटली नव्हती. ती दूर करण्यासाठी १२ हजार लिटर पाणी टॅंकर घेण्याचे नियोजन प्रशासनाने चालवले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५५ लाख रूपयांचा निधी मिळाला असून महापालिका स्वनिधी घालणार आहे.
उंच इमारतींना शहरात परवानगी देण्याचे धोरण ठरल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. आग वा इतर आपत्ती ओढवल्यास त्यातून वाचवण्यासाठी काही उपाययोजना गरजेच्या होत्या. त्यासाठी टर्न टेबल लॅडरची बांधकाम व्यावसायिकांकडून मागणी होत होती. त्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मदतीतून लॅडर घेण्यात येऊन अग्निशमन दलाच्या ताफ्यातही दाखला झाला. ते चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. सध्याच्या लॅडरमध्ये असलेल्या ५५ मीटर उंचीच्या शिडीमुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करता येते. पण त्या उंचीवर लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी त्या इमारतीमधील पाण्यावरच अवलंबून रहावे लागत होते. लॅडरच्या माध्यमातून नागरिकांची सुटका करण्याबरोबरच तेथील आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी टॅंकरची गरज होती.
जास्त साठवण क्षमता तसेच ५५ मीटर उंचीपर्यंत पाणी फेकणारा पंप अशा ताकदीचा टॅंकर आवश्‍यक होता. त्यासाठी जवळपास ७० लाखांचा खर्च आहे. जिल्हा नियोजन समितीकडे त्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यातून ५५ लाख रूपयांचा निधी मिळाला असून त्यावरील निधी महापालिका घालणार आहे. त्याच्या प्रस्तावाची मंजुरी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या टॅंकरचे कनेक्शन लॅडरला जोडल्यास ५५ मीटरपर्यंत पाणी फेकता येणार आहे.
-----------------
चौकट
लॅडरची सोय होणार कावळा नाक्यावर
लॅडरची लांबी जास्त असून सध्याच्या फायर स्टेशनमध्ये ते पूर्ण उभे करता येत नव्हते. त्यातच कावळा नाका फायर स्टेशनची नवीन इमारत उभी केली जाणार होती. त्यासाठी लॅडरसारख्या लांबीची वाहने उभी करण्याच्यादृष्टीने आराखडा करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्यामार्फत या स्टेशनसाठी एक कोटी रूपयांच्या निधीचा पहिला टप्पा आला आहे. त्यातून इमारत उभी करण्याचे काम सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ७५ लाखांचा निधी येणार आहे. लावण्याची सोय नव्हती, तीही कावळा नाका येथे नवीन बांधल्या जात असलेल्या फायर स्टेशनमध्ये केली जात आहे.
----------------
कोट
लॅडर हे रेस्क्यू वाहन असून पाणी मारण्याची जादा व्यवस्था करता येते. त्यानुसार जादा ताकदीच्या टॅंकरसाठी निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
- मनिष रणभिसे, फायर स्टेशन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT