कोल्हापूर

गडहिंग्लज आगाराला अडीच लाखांचे उत्पन्न

CD

गडहिंग्लज आगाराला अडीच लाखांचे उत्पन्न
काळभैरी यात्रा; तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी, २५ गाड्या कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : येथील आगाराला श्री काळभैरी यात्रेतून घसघशीत उत्पन्न मिळाले आहे. केवळ एका दिवसांत दोन लाख ५३ हजारांचे उत्पन्न मिळाले. यात्रेसाठी २५ गाड्या कार्यरत होत्या. साठ कर्मचारी यासाठी कार्यरत होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा न झाल्याने एसटीला या हमखास उत्पन्नापासून मुकावे लागले होते.
येथील ग्रामदैवत आणि सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री काळभैरीची यात्रा झाली. एकदिवसीय या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह लगतच्या गोव्यातील भाविक आले होते. येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बड्याचीवाडीच्या डोंगर कपारीतील मंदिरात यात्रा झाली. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त यात्रा झाली. भाविकांना येथून डोंगरापर्यंत आणि परत जाण्यासाठी येथील आगाराने बसची सोय केली होती. यासाठी यात्रास्थळी तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी केली होती.
आदल्या दिवशी सायंकाळपासून बस सोडल्या होत्या. यात्रेदिवशी पहाटेचे पाचपासून बस फेऱ्या सुरू होत्या. यात्रेसाठी २५ बस कार्यरत होत्या. एकूण चौदा हजार भाविकांनी बस फेरीचा लाभ घेतला. यात ४८० फेऱ्या झाल्या. त्यातून २ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार प्रमुख संजय चव्हाण यांनी दिली. मुख्यत्वेः खासगी दोनचाकी आणि चारचाकी गाड्यांना एमआयडीसीच्या वाहनतळापर्यंतच परवानगी होती. त्यामुळे केवळ बसमधूनच जाणाऱ्या भाविकांना थेट डोंगरावर जाण्याची सोय झाली. परिसरातील सर्वच यात्रासाठी नियोजन राबविणार असल्याचे व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT