कोल्हापूर

मुख्यमंत्री वाढदिवस- राजेश क्षीरसागर

CD

81694
मुंबई : येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवासानिमित्त शुभेच्छा देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर.

मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिनी विविध उपक्रम
कोल्हापूर, ता. ९ : महाआरोग्य शिबीर, वृद्धाश्रमात फळे वाटप, खेळाडूंना फुटबॉलचे कीट वाटप यांच्यासह अन्य सामाजिक उपक्रमांमुळे आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोत्सव ठरला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने हे उपक्रम झाले. तसेच सायंकाळी क्षीरसागर यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.
सकाळी युवासेनेतर्फे अंबाबाई मंदिरासह अन्य मंदिरात अभिषेक घालण्यात आला. यानंतर शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ यांचेवतीने पंचगंगा हॉस्पिटल येथे आयोजित महिलांसाठीच्या महाआरोग्य शिबिराचे उद्‍घाटन पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. शिवसेना विभाग राजारामपुरीच्यावतीने पांजरपोळ येथील गो- शाळेस चारावाटप झाले.
आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप झाले. शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ यांच्यावतीने गंगावेश चौक येथे गरजूंना खिचडी वाटप केली. कोल्हापुरी थाळीचे संयोजक पापा प्रभावळे यांच्यावतीने गरजूंना अन्नदान झाले. शिवसेना कोल्हापूर दक्षिण विभागातर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप केले. मंगळवार पेठ आणि जुना बुधवार पेठेतर्फे मंगळवार पेठ येथील अंधशाळेतील मुलांना फळे व अल्पोपहार वाटप झाला. मंगळवार पेठ विभागाने शालेय खेळाडूंना पाटाकडील तालीम येथे फुटबॉल किटचे वाटप केले. शिवसेना विभाग जुना बुधवार पेठ यांच्यावतीने विवेकानंद शाळा जुना बुधवार पेठ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवशक्ती-भीमशक्ती शाखा राजेंद्रनगर यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT