कोल्हापूर

सेंद्रिय गुळाची गोड कहाणी.... रिपोर्ताज

CD

86244

रिपोर्ताज
सदानंद पाटील


सेंद्रिय गुळाची गोड कहाणी....
कुर्लीतील माने यांचे गुऱ्हाळघर; १६ वर्षांपासून उत्‍पादन

लीड
गुऱ्हाळघर म्‍हणजे भरपूर व्याप. वेळेत मनुष्यबळ उपलब्‍ध होणे, चांगला ऊस मिळणे आणि केलेल्या गुळाला चांगला दर मिळणे आता मुश्‍‍कील झाले असल्याचे गुऱ्हा‍हाळघर मालकांकडून वारंवार ऐकायला मिळते. अशा परिस्‍थितीत १०० टक्‍के सेंद्रिय गुळाचे उत्‍पादन घेणे म्‍हणजे कठीण काम. एक, दोन नव्‍हे तर १६ वर्षे सेंद्रिय गुळाचे उत्‍पादन घेऊन बाजारात ठसा उमटवलेल्या कुर्ली (ता. निपाणी) येथील संभाजी बापू माने यांच्या गुऱ्हाळघराची कहाणीच न्यारी. त्यांची शेती व सेंद्रिय गुऱ्हाळघराची जबाबदारी चंद्रकांत, आबाजी व रघुनाथ यादव यांच्याकडे सोपवली आहे. त्यांना भेटून सेंद्रिय गूळ करण्याची प्रक्रिया कशी असते, याची माहिती घेतली.

.......................


दुपारी बाराच्या सुमारास कोल्‍हापूरची वेस ओलांडत राष्‍ट्रीय महामार्गावर प्रवेश केला. उन्‍हाचा तडाखा चांगलाच होता. महामार्गावर अधून-मधून दुचाकी वाहन रस्‍त्यावर येत होते. कणेरी, कागलला मागे टाकत गाडी कर्नाटकच्या कोगनोळी टोल नाक्यावर पोचली. टोल नाका ओलांडून हालसिद्धनाथ अर्थात आप्पाचीवाडीच्या दिशेने गाडी सुसाट निघाली. मंदिराच्या बाजूनेच कुर्ली रस्‍त्याला गाडी लागली. पाच मिनिटांत सर्जेराव माने यांच्या सेंद्रिय गुऱ्हा‍ळघरावर पोचलो. गूळव्याचे काम करणारे रघुनाथ यादव निपाणीला गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधला. अर्ध्या किलोमीटरवर असल्याचा त्यांचा निरोप होता.


सेंद्रिय गूळ अन् देशी गायींचा गोठा....
गुऱ्हा‍ळघरातील मूक-बधिर आला. त्याने हातवारे करत देशी गायींची गोशाळा दाखवली. रासायनिक खतांऐवजी गायीच्या शेण, गोमूत्रापासून तयार केलेली खते, पिकांवर फवारले जाणारे जीवामृत दाखवले. तेवढ्यात रघूनाथ यादव गुऱ्हाळघरावर पोचले. खरेतर गुऱ्हाळघर पाहण्यासाठी आलो होतो. त्यामुळे गोशाळा व खतनिर्मिती दाखवण्याचे कारण काय, असा प्रश्‍‍न सहजच यादव यांना विचारला. यावर त्यांनी हसतच सेंद्रिय गुळाची कहाणी देशी गायींच्या गोठ्यापासूनच सुरू होत असल्याचे सांगितले.

उसाची लागवडच सेंद्रिय पद्धतीने...
गोशाळेत आठ ते दहा गायी व वासरं आहेत. गोठ्याच्या बाजूला पंधरा एकरपैकी पाच एकरांत ऊस आहे. तो सेंद्रिय आहे. म्‍हणजेच उसाला रासायनिक लागवड किंवा कीडनाशकांचा वापर होत नाही. जीवामृत व गायीचे शेण एवढ्यावरच उत्‍पादन घेतले जाते. यापासून गुळाची निर्मिती होते. रासायनिक खते वापरून मोठे उत्‍पादन मिळते. साखरेचे मानवी आरोग्यावर दुष्‍परिणाम होतात. त्यामुळेच शंभर टक्‍के सेंद्रिय उत्‍पादन घेतो, हे यादव यांनी अभिमानाने सांगितले. सोळा वर्षे सहा एकरावर सेंद्रिय ऊस उत्‍पादन व त्यापासूनच गूळनिर्मिती केली जाते.

पाच एकर उसातून पंधरा टन गूळ...
सेंद्रिय उत्‍पादनामुळे उसाची उत्‍पादकता कमी आहे. एकरी १५ ते २० टन उसाचे उत्‍पादन होते. पाच एकरांतून साधारणपणे चौदा ते पंधरा टन गुळाचे उत्‍पादन घेतले जाते, असे सांगतच त्यांनी मुख्य गुऱ्हाळघरातील माहिती देण्यास सुरुवात केली. अत्यंत कमी जागेत युनिक गुऱ्हाळघर आहे. प्रत्येक ऊस स्‍वच्‍छ धुवून खराब ऊस बाजूला काढूनच रस काढला जातो. कोणत्याही परिस्‍थितीत बारा महिन्याच्या आत ऊसाची तोड केली जात नाही. पाच एकरांतील उसाचे गाळप व गूळनिर्मितीस अडीच महिने लागतात, असे सांगत यादव यांनी गुऱ्हाळघरातील मशीन, त्याचे काम व उत्‍पादनाची माहिती दिली.

एक किलो गूळ दीडशे रुपयांना...
गुणवत्ता चांगली असल्याने गुळाला किलोला १५० रु. भाव मिळतो. उत्‍पादनाची शुध्‍दता चांगली असल्याने त्यांना बाजारपेठ शोधावी लागत नाही. गुऱ्हाळघरातील सर्व उत्पादने विकत घेण्याचा काहींनी प्रयत्‍न केला. त्याला यादव बंधूंनी स्‍पष्‍ट नकार दिला. चांगली गुणवत्ता व प्रामाणिकपणे उत्‍पादन घेतले तर दर्जेदार ब्रँड कसा तयार होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गुऱ्हाळघर आहे. कर्नाटकचे कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनाही मोह आवरला नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी गुऱ्हाळघराची पाहणी केली कौतुक केले. यादव बंधूंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT